Bandatatya Karadkar | बंडातात्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : वारकरी संप्रदातांतून बंडातात्यांची हकालपट्टी करा .. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी आक्रमक
वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करून बंडातात्यांनी संपूर्ण वारकरी परंपरा भागवत धर्माचा त्यांनी अपमान केला आहे. त्यांचा करावा तितका निषेध केला आहे. बंडातात्यांचे हे वक्तव्य हे केवळ प्रसिद्धीसाठी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे लाखो वारकऱ्यांची मान शरमेने खाली गेली आहे.

णे – शहरात ह.भ.प. बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar)यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी (Nationalist Congress Women’s Front)आक्रमक झाली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व बंडातात्या कराडकर यांच्या निषेध करण्यासाठी ज्ञानेश्वर पादूका चौकात आंदोलनकरण्यात आले. यावेळी बंडातात्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला. बंडातात्या हाय हाय .. महिलांचा अपमान करणाऱ्या बंडातात्या कराडकरांचा निषेध असो, या बंड्याच करायचं काय खाली डोकं वर पाय अशी घोषणाबाजी करत महिलांनी आंदोलन केलं. वारकरी (Warakari )संप्रदायाला मोठी परंपरा आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करून बंडातात्यांनी संपूर्ण वारकरी परंपरा भागवत धर्माचा त्यांनी अपमान केला आहे. त्यांचा करावा तितका निषेध केला आहे. बंडातात्यांचे हे वक्तव्य हे केवळ प्रसिद्धीसाठी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे लाखो वारकऱ्यांची मान शरमेने खाली गेली आहे. त्यामुळे वारकरी पंथातून बंडातात्यांची वारकरी पंथातून हकाल पट्टी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
महिला आयोगाने मागितला खुलासा
राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या धोरणाला विरोध करत असताना बंडातात्या कराडकरांनीकाळ काल गुरुवारी साताऱ्यात बंडातात्या कऱ्हाडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे दंडवत आणि दंडूका असे आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्यांचा राज्यभर त्यांचा निषेध नोंदवण्यात आला होता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बंडातात्या कराडकर यांच्याकडे या वक्तव्याचा खुलासा मागितला आहे. या प्रकारची विचारसरणी ही भाजप आणि संघाची असल्याचे मतही आंदोलकांनी व्यक्त केलं
बंडातात्या कराडकर यांची जाहीर माफी
दरम्यान, कराडकर यांनी त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. या महिलांबद्दल मला कोणताही वैयक्तिक आकस नाही. माझ्याकडून ते वक्तव्य अनावधानाने निघाले. मी त्याबद्दल माफी मागतो. तसेच कोणाच्या भावना दुखावल्या तर दिलगिरी व्यक्त करतो, असे बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत.
Video: पतंगराव कदमांचा एक पोरगा कशानं गेला माहितय का? बंडातात्या कराडकरांनी मर्यादा ओलांडली? Rupali Patil | बंडातात्या दारु पिऊन बोलले, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचं त्याच भाषेत उत्तर, आणखी काय बोलल्या?