वंदे भारत एक्स्प्रेसमुळे 16 रेल्वेच्या वेळा बदलल्या, उपनगरी रेल्वे वेळेतही बदल
सीएसएमटीवरुन पुणे मार्गे सोलापूरला वंदे भारत एक्स्प्रेस जाणार आहे. या रेल्वेसाठी 11 फेब्रुवारीपासून अनेक गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. तसेच उपनगरी रेल्वे अन् डेमूच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी शुक्रवारी वंदे भारत एक्स्प्रेसचे ( Vande Bharat Train ) उद्घाटन केले. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथून दोन एक्स्प्रेसला सुरुवात झाली. सीएसएमटीवरुन एक वंदे भारत ट्रेन नाशिक मार्गे शिर्डीला ( Nashik – shirdi ) जाणार आहे. सीएसएमटीवरुन पुणे मार्गे सोलापूरला वंदे भारत एक्स्प्रेस जाणार आहे. या रेल्वेसाठी 11 फेब्रुवारीपासून अनेक गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. तसेच उपनगरी रेल्वे अन् डेमूच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. आता प्रवाशांनी रेल्वेचे नवीन वेळापत्रक पाहूनच घराबाहेर निघावे.
16 रेल्वेच्या वेळा बदलल्या
हे सुद्धा वाचा
- सिद्धेश्वर एक्स्प्रेस सोलापूरहून रात्री 10.40 ऐवजी 10.30 वाजता सुटणार आहे.
- नवी दिल्ली- बेंगळुरू एक्स्प्रेस सोलापुरातून बंगळुरूच्या दिशेने आता 10.40ऐवजी 10.55ला जाणार आहे.
- नागपूर-पुणे एक्स्प्रेस (12114) या ट्रेनच्या दौंड स्थानकातील वेळेत बदल केला आहे. ही ट्रेन दौंडला 7.33ला येईल आणि 7.35ला जाईल. ही ट्रेन पुण्याला सकाळी 9.05 ऐवजी अर्ध्या तासानंतर म्हणजे 9.30ला पोहोचेल.
- नागपूर-पुणे एक्स्प्रेस (12136) ही ट्रेन दौंडला 7.23 ऐवजी 7.33ला येईल आणि 7.25 ऐवजी 7.35ला रवाना होईल. ही ट्रेन पुण्याला 9.05 ऐवजी 9.30ला येणार आहे.
- बिलासपूर-पुणे एक्स्प्रेस दौंडला 7.33ला पोहोचून 7.35ला रवाना होईल. ही ट्रेनही पुण्याला 9.05 ऐवजी 9.30ला येणार आहे.
- हावडा-पुणे दुरंतो एक्स्प्रेस पुण्याला 9.40ऐवजी 9.45ला येणार आहे.
- जसीडीह-पुणे एक्स्प्रेस ही ट्रेनही पुण्याला 9.40ऐवजी 9.45ला येणार आहे.
- जम्मू तावी-पुणे एक्स्प्रेस आता पुण्याला 3.55 ऐवजी 4.00वाजता पोहचणार आहे.
- इंदूर-दौंड एक्स्प्रेस दौंडला 10.20 ऐवजी 10.30 वाजता येणार आहे.
- हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस ही ट्रेन वाडी स्थानकात रात्री 2.00 वाजता येईल आणि 2.05 वाजता रवाना होईल. ही ट्रेन पुण्याला 8.55 ऐवजी 9.00 वाजता येणार आहे.
- मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस ही सीएसटी इथून 6.15 ऐवजी आता 5.30 वाजता रवाना होईल.
- लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज एक्स्प्रेस नाशिकरोड इथे आता 9.10 ला पोहोचेल आणि 9.15ला रवाना होणार आहे.
- लोकमान्य टिळक टर्मिनस- अयोध्या कँट एक्स्प्रेस नाशिकला 9.10ला पोहोचेल आणि 9.15ला रवाना होईल.
- वाराणसी लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ही ट्रेन एलटीटी इथे 10.55 ऐवजी 11.10 वाजता पोहोचेल.
- हावडा-मुंबई एक्स्प्रेस ही एलटीटी स्थानकात रात्री 11.00 ऐवजी 11.45 वाजता पोहोचेल.
- मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस ट्रेन सीएसटी इथून 10.45 ऐवजी 10.40 वाजता सुटणार आहे. 14 फेब्रुवारीपासून हा बदल लागू होणार आहे.
पुणे-लोणावळा सहा लोकलच्या वेळापत्रकात बदल
- पुणे तळेगाव लोकल तळेगावला 9.47 ऐवजी 9.43ला पोहोचणार आहे.
- पुणे लोणावळा लोकल ही पुण्याहून 9.55 ऐवजी 9.57ला सुटेल.
- पुणे-बारामती लोकल दौंडहून 8.20 ऐवजी 8.25ला सुटेल.
- लोणावळा-पुणे लोकल शिवाजी नगर येथून 7.38 ऐवजी 7.40ला सुटेल.
- पुणे लोणावळा लोकल 8.05 वाजता शिवाजीनगर पर्यंतच चालवली जाईल.
- पुणे लोणावळा लोकल पुण्याहून 8.35 ऐवजी 8.37ला सुटेल आणि लोणावळ्याला 9.50 ऐवजी 9.57ला पोहोचेल.
दोन डेमू सेवेच्या वेळेतही बदल
- पुणे सोलापूर डेमूच्या सेवेतही बदल करण्यात आला आहे.
- पुणे सोलापूर डेमू गाडी पुण्याहून 8.30 ऐवजी आता पाच मिनिटं लवकर 8.25 सुटणार आहे.