AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Ganeshotsav : प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीतर्फे जादा बसेस, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

बाहेर गावाहून येणाऱ्या असो की पुणेकर. कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होऊ नये, याकरिता पहाटेपर्यंत जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे.

Pune Ganeshotsav : प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीतर्फे जादा बसेस, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
पीएमपीएमएलतर्फे जादा बसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 3:51 PM

अभिजीत पोते, पुणे : पुण्यातील गणेशोत्सवासाठी (Pune Ganeshotsav) आता पीएमपीएल प्रशासन देखील सज्ज झालेले पाहायला मिळत आहे. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक पुण्यात येत असतात आणि त्याच भाविकांची तसेच पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून गणेशोत्सवाच्या काळात पीएमपीएमएल (PMPML) 822 इतक्या जादा बसेस सोडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या जादा बसेसचे पीएमपीएमएलकडून दोन टप्प्यात नियोजन करण्यात आले आहे. त्यातच पुण्यातली विसर्जन मिरवणूक पाहायला देखील अनेक जण येत असतात. त्यामुळे पीएमपीकडून विसर्जनाच्या दिवशी तब्बल 654 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तर इतर 168 बस या उद्या आणि परवा गणेश आगमनाच्या (Ganesh Chaturthi) वेळी सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी पीएमपी घेत असल्याचे दिसून येत आहे.

अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार

विसर्जनाच्या दिवशी पीएमपीएमएलची बस सेवा ही पहाटेपर्यंत सुरू राहणार असून रात्रीच्या प्रवासाला मात्र प्रवाशांना 25% अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे गणेशोत्सव सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नाही. यंदा तो धुमधडाक्यात होत आहे. त्यामुळे गर्दीही वाढणार आहे. बाहेर गावाहून येणाऱ्यांची गर्दी पाहता त्यांची गैरसोय होऊ नये, याकरिता पीएमपी प्रशासन सज्ज झाले आहे.

पीएमपीतर्फे जादा बस

बसस्थानकांवरही गर्दी

बाहेर गावाहून येणाऱ्या असो की पुणेकर. कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होऊ नये, याकरिता पहाटेपर्यंत जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, उद्या गणरायाचे आगमन होणार असून त्यानिमित्त बसस्थानकांवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. बाहेरगावी जाणारे तसेच येणाऱ्या प्रवाशांमुळे पुण्यातील बसस्थानके तसेच पीएमपीलादेखील गर्दी झाल्याचे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

एसटीचीही तयारी

पीएमपीप्रमाणेत एसटीनेही जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. वाढली गर्दी पाहता ही निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवासाठी पुणे आणि मुंबईतून हजारो चाकरमानी हे कोकणात जात असतात. त्यासाठी या गणेशोत्सवासाठी जवळपास 356 जादा बसेस सोडण्याचा निर्णय पुणे एसटी महामंडळाने घेतला आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.