VIDEO | पुणे-नाशिक रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध, नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीवर शेतकऱ्याचं शोले स्टाईल आंदोलन

राज्यातील महत्वाच्या पुणे-नाशिक रेल्वे आणि पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या जमीन संपादनाला खेडमध्ये शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे.

VIDEO | पुणे-नाशिक रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध, नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीवर शेतकऱ्याचं शोले स्टाईल आंदोलन
farmer-sholey-style-agitation-
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 11:06 AM

पुणे : राज्यातील महत्वाच्या पुणे-नाशिक रेल्वे आणि पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या जमीन संपादनाला खेडमध्ये शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. या प्रकल्पाला विरोधत करत शेतकऱ्यांना शोले स्टाईल आंदोलन केले आहे. यावेळी अनेक शेतकरी हे खेड प्रांताधिकारी कार्यालयासमोरील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीवर बसले आहेत. (Farmer Agitation against Nashik Pune Semi High Speed Railway Project)

पाण्याच्या टाकीवर बसून शोले स्टाईल आंदोलन

‘पुणे नाशिक रेल्वे, रिंग रोड हटावा शेतकरी बचाव’ असा नारा देत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलंय. रक्त सांडलं तरी प्रकल्पाला जमिनी देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी यापूर्वी घेतली होती. यानंतर आता काही शेतकरी हे खेड प्रांताधिकारी कार्यालयासमोरील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत आहे.

यातील अनेक शेतकरी हे उडी मारुन आत्मदहन करण्याच्या तयारीत आहेत. आत्मदहन आंदोलनासाठी पाण्याच्या टाकीवर चढलेल्या शेतकऱ्याला खाली उतरण्याची विनंती पोलिसांकडून केली जात आहे. मात्र हे शेतकरी हे पाण्याच्या टाकीवर बसून शोले स्टाईल आंदोलन करत आहे. तसेच गेल्या सात दिवसांपासून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर “ज्ञानेश्वरी व गाथा पठण करत आंदोलन करत होते. तसेच चक्री उपोषण आंदोलनाकडे शासकीय पातळीवरुन दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.

शेतकऱ्यांचा विरोध का?

रेल्वेसाठी भूसंपादन करत असताना, जर रेल्वे ही शेती क्षेत्रातून गेल्यानंतर दुतर्फा बाजूला अल्प स्वरूपात जागा सुटत आहे. या जागेचा शेतकऱ्यांना काडीमात्र फायदा होणार नाही. भूसंपादन करत असताना कुक्कुटपालन,घर,ओटा,बोअर वेल,कांद्याची चाळ,विहीरी व इतर अनेक स्वरूपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या भूसंपादनला विरोध केला आहे.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्पाची वैशिष्ट्ये

?235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग ?रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार ? रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग 250 कि.मी. पर्यंत वाढविणार ?पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार ?वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पूरक प्रकल्प ?पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी ?18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित ?प्रवासी आणि मालवाहतुक चालणार ?रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह, स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य ?प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार ?प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा ?कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार ?विद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार

पाहा व्हिडीओ : 

(Farmer Agitation against Nashik Pune Semi High Speed Railway Project)

संबंधित बातम्या : 

‘रक्त सांडलं तरी जमिनी देणार नाही’, पुणे-नाशिक रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

नाशिक पुणे सेमीहायस्पीड रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध, वाकी बुद्रुकचे शेतकरी आक्रमक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.