भोरमधील वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकरी आक्रमक ; धरणे आंदोलन करत महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर
महावितरणाच्या या कारवाईचा वीजबिल भरलेल्या, तसेच चुकीची वीजबिल दुरुस्त झाली नाहीत. अशा शेतकऱ्यांना देखील फटका बसला आहे. नसरापूर परिसरातील नायगाव, देगांव, दिवळ, कांजळे, वरवे, कामथडी या गावातील शेतकऱ्यांनी नसरापूर येथील कार्यालयासमोर धरणं आंदोलनं करून उपकार्यकारी अभियंता एन एन घातुळे यांना याबाबतं जाब विचारला.
विनय जगताप, पुणे – कृषी पंपाचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने पुणे सातारा महामार्गलगतच्या, भोरच्या(Bhor) नसरापूर परिसरातील गावांच्या रोहित्रांचा वीजपुरवठा (Electricity) खंडित केला आहे. यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी (Farmers) महावितरणाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनं करून अधिकाऱ्यांना जाब विचारला. मीटर रिडींग न घेता आकारलेली चुकीची बिले दुरुस्त करून, तातडीने खंडित केलेला वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. दरम्यान बिल दुरुस्तीसाठी गावोगावी राबविण्यात येणाऱ्या तातडीने कारवाई कारवाई करण्यात येत असल्याची माहिती महावितरणा कडून देण्यात आलीय.तालुक्यातील भाजप आणि शिवसेना नेत्यांनीही शेतकऱ्यांची बाजू घेऊन महावितरणाच्या भोंगळ कारभारावर टीका केली.
महावितरणाचा भोंगळ कारभार
कृषी पंपाचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने पुणे सातारा महामार्गलगतच्या,भोरच्या नसरापूर परिसरातील गावांच्या रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केलाय. याविरोधात शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनं करून अधिकाऱ्यांना जाब विचारला.मीटर रिडींग न घेता आकारलेली चुकीची बिले दुरुस्त करून, तातडीने खंडित केलेला वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केलीय. दरम्यान बिल दुरुस्तीसाठी गावोगावी राबविण्यात येणाऱ्या शिबिरात तातडीने कारवाई कारवाई करण्यात येत असल्याची माहिती महावितरणा कडून देण्यात आलीय.तालुक्यातील भाजप आणि शिवसेना नेत्यांनीही शेतकऱ्यांची बाजू घेऊन महावितरणाच्या भोंगळ कारभारावर टीका केली आहे
या गावातील शेतकऱ्यांना फटका
महावितरणाच्या या कारवाईचा वीजबिल भरलेल्या, तसेच चुकीची वीजबिल दुरुस्त झाली नाहीत. अशा शेतकऱ्यांना देखील फटका बसला आहे. नसरापूर परिसरातील नायगाव, देगांव, दिवळ, कांजळे, वरवे, कामथडी या गावातील शेतकऱ्यांनी नसरापूर येथील कार्यालयासमोर धरणं आंदोलनं करून उपकार्यकारी अभियंता एन एन घातुळे यांना याबाबतं जाब विचारला. भाजप तालुका अध्यक्ष जीवन कोंडे, शिवसेनेचे आदित्य बोरगे यांनी देखील शेतकऱ्यांची बाजू घेऊन महावितरणाच्या भोंगळ कारभारावर टीका करत खंडित केलेला वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी केली.
थकबाकी मुळे महावितरण अडचणीत
शेतकऱ्यांना बिले न देताच ही कारवाई करण्यात आलीय, अनेक शेतकरी शेतात राहतात, त्यांची मोठी अडचण झालीय. महावितरणाने वापर झालेल्या विजेची बिलं ग्राहकांना द्यावीत, मात्र अंदाजे बिलं वसुल करू नयेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.तर थकबाकी मुळे महावितरण कंपनी अडचणीत आहे, बिल दुरुस्तीसाठी गावोगावी राबविण्यात येणाऱ्या शिबिरात तातडीने कारवाई करण्यात येतीय, त्याचा शेतकऱ्यांनी शिबिराचा लाभ घेऊन थकीत बिलांचा तातडीने भरणा करावा असं आवाहन महावितरणाकडून करण्यात येत आहे.
VIDEO: किरीट भावा, माझे गाळे असतील तर मला परत दे; महापौर किशोरी पेडणेकरांचा सोमय्यांना टोला
औरंगाबादेत महाविकास आघाडी एकवटली, नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी