धबधबा पाहायला आलेले बाप-लेक पोहायला उतरले, पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू
मावळ तालुक्यातील कोसगाव येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू झालाय. मृत वडीलांचं नाव पिराजी सुळे आणि मुलांची नावं सचिन सुळे आणि साईनाथ सुळे अशी आहेत.
पुणे : मावळ तालुक्यातील कोसगाव येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू झालाय. मृत वडीलांचं नाव पिराजी सुळे आणि मुलांची नावं सचिन सुळे आणि साईनाथ सुळे अशी आहेत. रविवारची सुट्टी असल्याने पिराजी सुळे हे आपल्या दोन्ही मुलांना घेऊन कुसगाव खुर्द येथील धबधबे पाहिला गेले. त्यावेळी कुसगाव खुर्द या ठिकाणी असलेल्या दगड खाणीच्या खड्डयाचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडून मृत्यू झाला असा, असा प्राथमिक अंदाज कामशेत पोलिसांनी वर्तवला आहे.
कुसगाव खुर्द येथील धबधब्याजवळ बुडून मृत्यू झालेल्या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. सुळे कुटुंबीय 12 वर्षांपूर्वी नांदेडहून मावळ तालुक्यातील कामशेत भागात उदरनिर्वाहासाठी आले होते. सध्या हे कुटुंब राहायला पण कामशेत भागात आहेत. आज (25 जुलै) रविवार असल्यामुळे कामशेत जवळ असलेल्या कुसगावचा धबधबा पाहायला गेले. त्या धबधब्याजवळ दगड खाण आहे. त्या दगडखाणीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं पाणी साचलं. या दगडखाणीमधील पाण्यामध्ये हे तिघे बुडाले.
मृतांची नावं?
- पिराजी सुळे (वडील, वय 40)
- सचिन सुळे (लहान मुलगा, 11)
- साईनाथ सुळे (मोठा मुलगा, 14)
हेही वाचा :
शेततळ्यात पोहण्याचा नाद जिवावर बेतला, गाळात फसल्याने दोन शाळकरी मुलांचा अंत
पुण्यात बंदी असतानाही पर्यटनासाठी बाहेर पडणं जीवाशी बेतलं, मावळमध्ये पवना धरणात तरुणाचा बुडून मृत्यू
पत्नी बुडत असल्याचं दिसलं, जीवाची पर्वा न करता पतीची उडी, सांगलीत तलावात बुडून दोघांचा मृत्यू
Father and two son drowning near a waterfall in Pune while swimming