Video | शेवटी आईचं काळीज ! बछड्यांना घेण्यासाठी मादी बिबट्या 2 दिवसांनी परतली
दोन दिवसांपूर्वी मुळशी तालुक्यातील (Mulshi) नेरे गावात सापडलेल्या तीन बछड्यांपैकी तीन दोन बछडे आता बिबट्याची (Leopard) मादी म्हणजे त्यांची आई घेऊन गेली आहे. आई आणि पिलांची भेट वनविभागाने लावलेल्या कॅमऱ्यामध्ये कैद झालीय.
पुणे : दोन दिवसांपूर्वी मुळशी तालुक्यातील (Mulshi) नेरे गावात सापडलेल्या तीन बछड्यांपैकी दोन बछड्यांना आता बिबट्याची (Leopard) मादी म्हणजे त्यांची आई घेऊन गेली आहे. आई आणि बछड्यांची भेट वनविभागाने लावलेल्या कॅमऱ्यामध्ये कैद झालीय. दोन दिवसांपूर्वी ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांना तीन बछडे आढळून आले होते. यातील दोन बछडे मादी तर एक नर बछडा होता. याची खबर वनविभागाला देण्यात आली होती. वनविभागाने बछडे परत त्याच ठिकाणी ठेवल्यानंतर आता मादी आपल्या दोन बछड्यांनी घेऊन गेली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद करण्यात आलाय.
आढळले होते तीन बछडे
पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी आयटी पार्क जवळील नेरे परिसरामध्ये ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले होते. हे तीन बछडे दोन मादी आणि एक नर जातीचे होते. या सर्व बछड्यांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले होते. ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना हे बछडे दिसले होते. यावेळी बिबट्याचे तब्बल तीन बछडे एकाच ठिकाणी सापडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे तीनही बछडे ज्याठिकाणी आढळून आले त्याच ठिकाणी सोडण्याचा निर्णय वनविभागाने घेतला होता.
पाहा व्हिडीओ :
मादी बछडे दुसरीकडे घेऊन गेली
त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बछडे परत उसामध्ये ठेवले होते. तसेच येथे कॅमेरा लावला होता. दरम्यान, दोन दिवसानंतर मादी बिबट्याने तीनपैकी आपले दोन बछडे दुसरीकडे नेले आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.
इतर बातम्या :
Video | …आणि आमदार संदीप क्षीरसागर चक्क स्वतः झाडावर चढले! असं त्यांनी नेमकं का केलं?
Mumbai Bus | मुंबईत बेस्टच्या ताफ्यात लवकरच 900 डबलडेकर बसेस, कमी पैशात किफायतशीर प्रवास होणार