खासगी शाळांतून पालकांना झालेल्या मारहाण प्रकरणी संचालक, बाऊन्सरवर गुन्हा दाखल करा; नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

पुणे येथे एका खासगी शाळेने फी भरण्यावरून पालकांना खासगी बाऊन्सरच्या माध्यमातून मारहाण करण्याचा प्रकार नुकताच घडला होता. या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

खासगी शाळांतून पालकांना झालेल्या मारहाण प्रकरणी संचालक, बाऊन्सरवर गुन्हा दाखल करा; नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
Nilam GorheImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 8:27 PM

मुंबई: राज्यातील सर्व खासगी शाळांनी (Private School) पालक आणि विद्यार्थी (Student) यांना अतिशय सामंजस्याने वागविण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना फी अभावी शाळेतून घरी ठेवू नये अथवा त्यासाठी पालकांना नाहक त्रास देऊ नये याकरिता शालेय शिक्षण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी. पुण्यातील खाजगी शाळेत पालकांना (guardian) झालेल्या मारहाण प्रकरणात शाळा संचालक व बाउन्सरवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिल्या.

पुणे येथे एका खासगी शाळेने फी भरण्यावरून पालकांना खासगी बाऊन्सरच्या माध्यमातून मारहाण करण्याचा प्रकार नुकताच घडला होता. या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

गैरवर्तन करणाऱ्या राज्यात अनेक शाळा

या बैठकीमध्ये राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. खासगी शाळांमध्ये बाऊन्सर नेमण्याची वेळ का येते याबाबत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. अशा प्रकारच्या गैरवर्तन करणाऱ्या राज्यातील शहरी भागातील अनेक शाळांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आलेल्या असून त्यांचा आढावा घेण्यात येत आहे. पुणे, रायगड आणि मुंबईतील काही खासगी शाळांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आलेल्या आहेत. शासनाला असलेल्या अधिकारांचा योग्य तो वापर करून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आठ दिवसांत अहवाल सादर करा

शाळांबाबत तक्रार निवारण समित्या, तक्रार निवारण अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली असून अशा स्वरूपाचे काही प्रकार घडल्यास स्थानिक पातळीवर सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गंभीर स्वरूपाच्या तक्रारीबाबत अधिकारी वर्गाने स्वत: पाहणी करून याबाबत कार्यवाही करावी. काही निवडक शाळांबाबत आलेल्या तक्रारीबाबत आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी आज शिक्षण संचालकांना दिले.

फी भरण्याच्या मुद्यांवरून बाऊन्सरकडून मारहाण

यावेळी उपस्थित असलेल्या पालक आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर शाळेच्या प्रशासनाने पालकांना शाळेत पालक सभेसाठी बोलावले असता फी भरण्याच्या मुद्यांवरून बाऊन्सरकडून मारहाण झाल्याचे कबूल केले असल्याचे सांगितले आहे. याबाबत पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली आहे.

नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या सूचना

महापालिकेच्या शिक्षणाधिकारी यांनी सादर केलेला अहवाल स्वीकारून त्यावर पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. पालकांना करण्यात आलेल्या धाकदपटशा आणि मारहाणीच्या पार्श्वभूमीवर संबंधित बाऊन्सर पुरवठा करणारी खासगी संस्था आणि शाळा प्रशासन यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. शाळा प्रशासनाने पालकांना शाळेत भेटण्याच्या वेळा निश्चित करून संपर्क व्यक्तीचे नाव आणि संपर्क क्रमांक शाळेच्या दर्शनी भागात पालकांना ठळक दिसेल अशा पद्धतीने लावण्यात यावे. तसेच अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्याना पूरक सोयी सुविधा आहेत किंवा नाही, अशा शाळांवर जर कायदेशीर कारवाई होणार असेल तर तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर शाळेत सहभागी करून घेण्यात यावे. या प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याबाबत पालकांना माहिती दिली पाहिजे.

प्रतिबंधात्मक कार्यवाही करा

पुणे शहरात झालेल्या प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाने तपशीलवार माहिती घेऊन प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. शाळांमध्ये बाऊन्सर नेमण्याऐवजी इतर पर्याय काय करता येतील याबाबत विचार करण्यात यावा. शाळा–पालक संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने यावर काम करीत असून त्यांना अधिक बळ मिळण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने तक्रार निवारण समितीमध्ये पालकांचे प्रतिनिधित्व 10% करण्यात येईल का याबाबत तपासणी करावी. शाळांचे व्यवस्थापन आणि पालक यांच्यासाठी विभागीय स्तरावर माहिती कार्यशाळा घेण्यात याव्यात. पनवेल, पुणे परिसरातील काही खासगी शाळांच्या तक्रारी आल्या असून त्यांची सखोल चौकशी करून वेळ पडल्यास विधान परिषदेमध्ये याबाबत लक्षवेधी सूचना मांडण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

या बैठकीला पर्यावरण, वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, विधान परिषद सदस्य बाळाराम पाटील, सचिव विकासचंद्र रस्तोगी, शुल्क नियंत्रण समितीचे सदस्य शिरीष फडतरे, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पुणे पालक संघटनेच्या जयश्री देशपांडे, अभिजित पोलेकर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावर संताप मोर्चा ; केंद्र आणि राज्य सरकारकडूनही घोर निराशा

Pune PMPML : तब्बल दोन वर्षानंतर पुण्यात पीएमपीएमएल रुळावर! मात्र, आर्थिक अडचणीमुळे पुणेकरांचा खोळंबा होणार?

जीव गेला तरी बेहत्तर पण जुन्नर बिबट सफारी बारामतीकरांच्या घशात जाऊ देणार नाही; असा इशारा राष्ट्रवादीला कुणी दिला?

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.