Pune crime : कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा, अश्लील व्हिडिओ काढून धमकीही दिली?
कुख्यात गुंड गजानन मारणेच्या (Gajanan Marne) मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रथमेश मारणे याच्यावर सिंहगड रोड (Sinhagad road) पोलीस (Police) स्टेशन येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणेच्या (Gajanan Marne) मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रथमेश मारणे याच्यावर सिंहगड रोड (Sinhagad road) पोलीस (Police) स्टेशन येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुलीशी मैत्री करून नंतर शारीरिक संबंध ठेवल्याची पीडित मुलीची तक्रार आहे. तसेच अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकी दिल्याचेही या मुलीने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान प्रथमेश मारणे याने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आरोपी हा फिर्यादीच्या कॉमन मित्रांपैकीच होता. आरोपीने या मुलीबरोबर ओळख वाढवून तिला खडकवासला धरण येथे फिरायला घेऊन गेला. येताना एका हॉटेलवर थांबवून तीच्याबरोबर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुणे-बंगळूर हायवेवरील राजगड हॉटेल, मुळशी अशा ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले.
‘काय करायचे ते कर, मी कुणाला घाबरत नाही’
हे सर्व करताना विशेष म्हणजे चोरून अश्लील व्हिडिओ शूट केले. हे व्हिडिओ डिलीट करण्याबाबत विचारल्यावर त्याने टाळाटाळ केली. फिर्यादीने या कृत्याबाबत पोलिसांत फिर्याद देण्याचे सांगितल्यावर त्याने तिला धमक्या दिल्या. काय करायचे ते कर, मी कुणाला घाबरत नाही, असे उडवाउडवीचे उत्तर दिले. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली.
विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल
याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे भा. दं. वि. कलम 376, 504, 506 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 प्रमाणे कलम 66 (E) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
कोण आहे गजा मारणे? (Who is Gajanan Marne)
गजा उर्फ गजानन मारणे हे पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. गुंड गजाजन मारणे याच्यावर 2014मधील दोन हत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणी गजा मारणे आणि समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गजाला 2014 पासून पुण्यातील येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तब्बल सात वर्षांनंतर गजाची सुटका झाली.