पिंपरी चिंचवडमध्ये रेनबो मॉलमध्ये आग, धुराचे लोट, आणि फक्त धावाधाव अनेकांना रेस्क्यू करून काढले बाहेर…
पिंपरी-चिंचवडमधील रेनबो मॉलमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागल्यानंतर मॉलमधील इमारतीमधून धुराचे लोट बाहेर पडत होते.
पिंपरी-चिंचवडः पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर येथे रेनबो मॉलच्या सर्व्हिस रूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. या आगीमुळे मॉलमसह परिसरात एकच गोंधळ उडाला. मॉलमध्ये ही आग लागल्यानंतर इमारतीतून धुराचे लोट बाहेर पडत होते. आगीने रौद्ररुप धारण करण्याआधी मॉलमध्ये काम करणाऱ्या 20 ते 25 जणांना रेस्क्यू करून अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढल आहे.
रेनबो मॉल हा पिंपरी चिंचवड परिसरातील उच्चभ्रू माॉल समजला जातो. सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्यानंतर मॉलमधील कर्मचाऱ्यांच्यासह नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली होती. आग लागतात मॉलच्या प्रशासनाने अग्निशमन दलाला फोनवरून माहिती दिल्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे 7 बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग अटोक्यात आणली.
पिंपरी-चिंचवडमधील रेनबो मॉलमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागल्यानंतर मॉलमधील इमारतीमधून धुराचे लोट बाहेर पडत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र अग्निशमन दलाकडून तात्काळ प्रयत्न करून ही आग अटोक्यात आणण्यात आली.
सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने इमारतीमधून बाहेर पडणारे धुराचे लोट त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यानंतर मॉलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना मात्र तात्काळ बाहेर पडता आलं नाही. आगीच्या धुरामुळं अनेकांना त्रास होत होता. त्यानंतर आलेल्या अग्निशमन दलामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
मॉलला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 20 ते 25 जणांना रेस्क्यू करून अग्निशमन दलाच्या जवानांनी कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. ही आग मोठी नसली तरी धुरामुळं अनेकांची घाबरगुंडी उडाली होती.
ही आग लागल्यानंतर परिसरात जोरदार गोंधळ उडाला होता. अग्निशमन दलाची वाहनं घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. मॉलमधून प्रचंड धूर निघत होता, त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले का असा प्रश्न नागरिकांना पडला होता.