VIDEO: पुण्यात ऊंड्री-पिसोळीत गोडाऊनला आग, भयानक आगीत गाद्यांसह संपूर्ण गोडाऊन बेचिराख

| Updated on: Feb 27, 2022 | 9:02 AM

पुण्यातील ऊंड्री पिसोळीत काल मध्यरात्री भीषण आग लागली. गाद्यांच्या गोडाऊनला लागलेल्या या भीषण आगीत संपूर्ण गोडावून जळून खाक झालं आहे. आग प्रचंड भीषण होती. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केल्याने या ठिकाणी आगडोंब उसळला होता. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच दहशत माजली होती.

VIDEO: पुण्यात ऊंड्री-पिसोळीत गोडाऊनला आग, भयानक आगीत गाद्यांसह संपूर्ण गोडाऊन बेचिराख
VIDEO: पुण्यात ऊंड्री-पिसोळीत गोडाऊनला आग, भयानक आगीत गाद्यांसह संपूर्ण गोडाऊन बेचिराख
Follow us on

पुणे: पुण्यातील ऊंड्री पिसोळीत (pune) काल मध्यरात्री भीषण आग (fire) लागली. गाद्यांच्या गोडाऊनला लागलेल्या या भीषण आगीत (Pisoli Fire Accident) संपूर्ण गोडावून जळून खाक झालं आहे. आग प्रचंड भीषण होती. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केल्याने या ठिकाणी आगडोंब उसळला होता. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच दहशत माजली होती. आग लागताच स्थानिकांमध्ये एकच धावपळ उडाली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण रात्रभर आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर केलं. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मात्र, आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. या आगीमुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती. अनेकांनी रात्रभर जागे राहून अग्निशमन दलाच्या जवानांना मदत केली.

pune fire

उंड्री-पिसोळी येथे आंबेडकर हॉटेलजवळ हे गोडाऊन आहे. हे गाद्यांचं गोडाऊन आहे. या गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केलं.

pune fire

गाद्यांचं गोडाऊन असल्याने आगीने पटकन पेट घेतला. त्यातच रात्रीच्यावेळी गार वारा सुटल्याने आगीने रौद्ररुप धारण केलं. बघता बघता आग अधिकच भडकली. अचानक आगडोंब उसळला आणि धुराचे लोट आकाशभर पसरले.

pune fire

आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिकांमध्ये एकच घबराट पसरली. स्थानिकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली. काही लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

pune fire

नागरिकांची ही धावपळ आणि गोंधळ सुरू असतानाच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या. या जवानांनी जीवाची बाजी लावून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. आगीमुळे संपूर्ण गोडावून आणि आजूबाजुचे एक दोन दुकाने जळून खाक झाले आहेत. गोडावूनमधल्या सर्व गाद्यांचा कोळसा झाला आहे.

pune fire

आगीत कोणीही अडकले नाही. कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी अग्निशमन दल आणि पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या:

आठवड्यापुर्वी आदित्य ठाकरेंची कोल्हापुरात प्रदूषणाबाबत बैठक, पंचगंगा नदी पात्रात पुन्हा मृत माशांचा खच; प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

विरार गोळीबार प्रकरणी शिवसेनेच्या चौधरींसह 8 जणांवर गुन्हा दाखल; बदला घेण्यासाठी फायरिंग केल्याचं उघड

भाजपचं ठरलं! पुणे महापालिकेची निवडणूक मुळीक यांच्या नेतृत्वात लढणार; कसा असेल निवडणुकीचा प्लान?