पिंपरी – आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेत सर्वचा राजकीयपक्ष सक्रिय झाले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपला पहिला धक्का बसला आहे. भाजप नगरसेवक वसंत बोराटे(BJP corporator Vasant Borate) यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party)केला प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे. वसंत बोराटे हे 2017 साली मोशी भागातून भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. स्थानिक नेत्यावर नाराज होते नगरसेवक वसंत बोराटे,नगरसेवकानी कामे करायची आणि त्याचे श्रये वरिष्ठांनी घ्याच अशा पध्दतीला कंटाळून दिला राजीनामा काल त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांकडे आपला राजीनामा दिला होता.
श्रेय वरिष्ठांनी घ्यायचे
मोशीत ग्रीन झोन आहे. त्यामुळे विकास रखडला आहे. अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यामुळे ग्रीन झोनचे रहिवाशी झोनमध्ये रूपांतर करण्याची पाच वर्षात वारंवार मागणी केली. पण, त्याला कोणी दाद दिली नाही. विकास कामे करण्यासाठी स्वातंत्र्य नाही. नगरसेवकांनी काम करायचे आणि त्याचे श्रेय वरिष्ठांनी घ्यायचे अशी पद्धत आहे.
भाजप नेत्यांकडून सहकार्य नाही
प्रशासकीय ताकद मिळाली नाही विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते. तेही झाले नाही. नदी सुधार प्रकल्पात नदीच्या बाजूचा परिसर विकसित होऊ शकला नाही परिणामी विकास कामांना गती मिळाली नाही. जनतेच्या दृष्टीने अपेक्षित कामे होऊ शकली नाहीत . मोशी, जाधववाडी भागातील लोक मोठ्या प्रमाणात महापालिकेला कर देतात. त्याप्रमाणात या भागातील नागरिकांना न्याय मिळाला नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.
मटण म्हणलं की तोंडाला पाणी सुटलंच समजा, पण उस्मानाबादी मटण म्हणजे… आss..हाss..हाss..!
औरंगाबादेत आणखी एक थाप, महिलेच्या हातानं गुप्तदान करायचं म्हणून लुटलं, काय घडली घटना?