Pune GBS Disease : चिंता वाढवणारी बातमी, पिंपरी-चिंचवडमध्ये GBS मुळे पहिला मृत्यू
Pune GBS Disease : सध्या पुणे आणि आसपासच्या परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. GBS नावाच्या आजाराची या भागात एक दहशत निर्माण झाली आहे. पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये GBS आजारामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसमुळे पहिला मृत्यू झाला आहे. हा 36 वर्षीय तरुण पिंपळे गुरवचा रहिवाशी होता. 21 जानेवारीला तो पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. मात्र उपचारासाठी आला, तेंव्हापासूनचं तो व्हेंटिलेटरवर होता. गेले आठ दिवस त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले, मात्र काल त्याने अखेरचा श्वास घेतला. पिंपरी-चिंचवडमध्ये आत्तापर्यंत जीबीएसचे 13 रुग्ण आढळलेत, त्यातील हा पहिला बळी ठरला. गुइलेन बॅरि सिंड्रोम आजारामुळे हा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये जीबीएसमुळं हा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.
वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मण गोफणेंनी ही माहिती दिलीये. पिंपळे गुरव भागातील हा तरुण ओला-उबेरचा चालक असून तो 21 जानेवारीला वायसीएम रुग्णालयात दाखल झाला. मात्र, त्याची तब्येत खालावलेली होती, त्यामुळं पहिल्याच दिवशी त्याला व्हेंटिलेटरवर घ्यावं लागलं होतं. तो ओला-उबेर चालक होता. टॅक्सी चालक असल्याने कोणत्या परिसरातील पाणी प्यायल्याने जीबीएसची लागण झाली, हे कळू शकलं नाही.
ससूनमध्ये एका महिलेचा मृत्यू
पुण्यासह राज्यातील अन्य भागात सध्या गुइलेन बॅरे सिंड्रोम नावाच्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. नुकतच पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेचा ‘जीबीएस’ने मृत्यू झाला. या आजारामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. संबंधित रुग्ण नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) नांदोशी येथील रहिवासी होत्या.
ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जीवाणू आढळले
गुइलेन बॅरे सिंड्रोम हा दूषित पाण्यामुळे होणारा आजार आहे. जीबीएस रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यास सुरुवात केली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून सिंहगड रस्ता परिसरातील जलस्राोतांसह खडकवासला धरणातील पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यात ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जीवाणू आढळल्याने हे पाणी प्रक्रिया न करता पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.
60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
पुण्यातील नांदेडगावातील 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय. मागील 15 दिवसांपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील नांदेडगावात अनेक रुग्ण हे जीबीएस बाधित आहेत. त्यातील हा एक रुग्ण होता. पुण्यातला तिसरा आणि राज्यातला चौथ्या रुग्णाचा मृत्यू झालाय. पुण्यात जीबीएस बाधित रुग्णाचा तिसरा बळी गेलाय. नांदेड गावातील रुग्णाला ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्यामुळे काही दिवस पुण्यातील खासगी रुग्ण्यालयात उचार सुरु होते. प्रकृती अजून खराब होताना पाहून कुटुंबाने महिलेला ससून रुग्णालयात दाखल केलं होत. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झालाय.