Kishor Aware Murder : किशोर आवारे खून प्रकरणात महत्वाचे अपडेट, पोलिसांना मिळाले मोठे यश

Kishor Aware Murder : पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात महत्वाची कारवाई झाली आहे.

Kishor Aware Murder : किशोर आवारे खून प्रकरणात महत्वाचे अपडेट, पोलिसांना मिळाले मोठे यश
Kishor Aware Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 9:00 AM

पुणे : येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची मे महिन्यात हत्या झाली होती. त्यानंतर या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. ही हत्या कशी झाली? याचा मास्टरमाइंड कोण? हत्येची सुपारी का दिली? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणात पोलिसांनी रघू धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे या आरोपींना अटक करुन पुरावे जमा केले होते. परंतु या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला व्यक्ती अजून फरार होता. त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुख्य आरोपी कसा आला जाळ्यात

किशोर आवारे हत्या प्रकरणात माजी नगरसेवक चंद्रभान तथा भानू खळदे असल्याचे समोर आले होते. परंतु हत्या झाल्यापासून तो फरार होता. या प्रकरणी पोलिसांनी विशेष तपास पथकांची निर्मिती केली होती. परंतु त्याला पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते. अखेरी शनिवारी पोलिसांनी त्याला पकडले. नाशिक येथून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांना आपले ठिकाण कळू नये म्हणून भानू खळदे नेहमी आपला मोबाइल बंद ठेवत होता. पोलिसांनी त्याचा मोबाइलचे लोकशन सतत तपासले. तर तो नेहमी आपले ठिकाण बदलत होता. खंडाळा, यवत, हैदराबाद, नाशिक असे त्याचे लोकेशन दिसत होते. अखेरी नाशिकमधील सिंधी कॉलनीत त्याचे लोकेशन कळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

का केली होती हत्या

तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे आणि त्याचा मुलगा गौरव खळदे यांनी या हत्येचा कट रचला होता. काही महिन्यांपूर्वी वृक्ष तोडी प्रकरणावरुन किशोर आवारे आणि भानू खळदे यांच्यात वाद झाला होता. त्यावरुन जुन्या नगरपरिषद परिसरात किशोर आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. त्याचाच राग बाप बेट्यांचा मनात होता. त्यामुळे भानू खळदे आणि त्याचा मुलगा गौरव याने किशोर आवारे यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आरोपींना सुपारी दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी केला होता प्रयत्न

गौरव खळदे यांने मे महिन्यापूर्वी जानेवारी २०२३ मध्येच किशोर आवारे यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. जानेवारी महिन्यात किशोर आवारे मावळ न्यायालयात जात असताना त्यांना ठार मारण्याचा प्लॅन ठरला. पण खूप गर्दी असल्यामुळे तो प्लॅन यशस्वी झाला नाही.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.