पुणे आयटी क्षेत्रातील कार्यरत माजी कर्मचाऱ्यास NIA ने का केली अटक? कोणाशी होता संबंध
Pune Crime News : पुणे शहरात सोमवारी आयबी आणि एनआयए यांनी संयुक्तरित्या कारवाई केली. या पथकाने एका तरुणास अटक केली. हा तरुण कधीकाळी माहिती अन् तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत होता. या प्रकाराने खळबळ उडली आहे.
पुणे : पुणे शहरात राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि इंटेलिजेन्स ब्यूरो (आयबी) यांच्यांकडून सोमवारी छापे टाकण्यात आले. या कारवाईत माहिती अन् तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एका व्यक्तीस अटक करण्यात आली. पुणे शहरातील कोंढवा परिसरात एनआयएकडून छापेमारी केली गेली. यावेळी जुबेर शेख (वय ३९ वर्ष) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. पुणे शहरात सोमवारी पोहचलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अन् आयबी यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
का केली एनआयने कारवाई
राष्ट्रीय तपास संस्थेने ISIS शी संबंध असल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातून चार जणांना अटक केली. त्यात जुबेर नूर मोहम्मद शेख याचा समावेश आहे. या कारवाईसंदर्भात शेखच्या एका कौटुंबिक मित्राने सांगितले की, जुबेर हा पूर्वी एका आयटी कंपनीमध्ये काम करत होता. काही काळापूर्वी त्याने नोकरी सोडली आणि मार्केटिंगचा व्यवसाय करत होता. त्याचा इसिसशी संबंध होता का? याबद्दल आम्हाला माहिती नाही.
आठवडापासून मागावर होते अधिकारी
एनआयचे अधिकारी गेल्या आठवड्यातही आले होते. त्यानंतर पुन्हा सोमवारी पहाटे चारच्या सुमारास एनआयएचे काही अधिकारी त्याच्या घरी आले. त्यानंतर जुबेर याला कोंढवा पोलिस ठाण्यात घेऊन गेले. दुपारी मुंबईवरुन इतर काही अधिकारी आले आणि त्यांनीही जुबेर याची चौकशी केली. त्यानंतर दुपारी 4 च्या सुमारास जुबेरला मुंबईला घेऊन गेले आणि संध्याकाळी त्याला अटक केली. या प्रकरणात २८ जून रोजी मुंबईत गुन्हा दाखल केला आहे.
जुबेर याचा इसिसशी संबंध
इस्लामिक स्टेटशी (ISIS) संबंध असल्याचा आरोप जुबेर याच्यावर आहे. इसिस मॉड्यूलचा पर्दाफाश त्याला अटक केल्यानंतर होणार आहे. या प्रकरणात दक्षिण मुंबईतील नागपाडा येथील ताबीश नासेर सिद्दककी आणि ठाणे येथील पडघात राहणारा शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना एनआयएने या प्रकरणात अटक केली