अकरावीच्या प्रवेशासाठी पहिल्या दिवशी 94 हजार ऑनलाईन अर्ज

FYJC admission | पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येतेय. १४ ते २२ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, विद्यार्थ्यांचे अर्ज, अर्जांची छाननी, दुरुस्तीची प्रक्रिया पार पडणार आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी पहिल्या दिवशी 94 हजार ऑनलाईन अर्ज
अकरावी प्रवेश
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 10:10 AM

पुणे: राज्यातील पाच महापालिका क्षेत्रांमध्ये अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी 94447 अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये पुण्यातील 18565 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येतेय.

या प्रक्रियेतंर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे, अर्ज भरणे, अर्ज सबमिट करणे यासाठी 22 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.

उच्च न्यायालयाने अकरावीच्या प्रवेशासाठीची (11th Admission) सीईटी (CET) रद्द केल्यानंतर आजपासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया (11th Admission Process) सुरू करण्यात आली होती. पुणे (Pune), पिंपरी चिंचवडसह (Pimpri Chinchwad) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), रायगड (Raigad) या भागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. १४ ते २२ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, विद्यार्थ्यांचे अर्ज, अर्जांची छाननी, दुरुस्तीची प्रक्रिया पार पडणार आहे. प्रवेश प्रक्रियेची सगळी माहिती 11thadmission.org.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

मदतीसाठी मार्गदर्शन केंद्रांची स्थापना

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी आणि पालकांना काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन केंद्रेही तयार करण्यात आली आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरासाठी ५३ मार्गदर्शन केंद्र तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांवर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेशी संबंधित अडचणी सोडवण्यास मदत केली जाणार आहे.

या सेंटर्सशी संपर्क साधल्यानंतर तिथले प्रतिनिधी तुम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करतील. https://pune.11thadmission.org.in/  या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुण्यातल्या सर्व ५३ मार्गदर्शन केंद्रांची माहिती उपलब्ध होईल. तुमच्या झोननुसार तुम्ही या केंद्रांवर जाऊन ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आपल्या अडचणी सोडवता येतील.

संबंधित बातम्या : 

11th Admission : 10वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, एमएमआरडीएसह कोणत्या जिल्ह्यात 11वी प्रवेश प्रक्रिया सुरु?

11th Admission : मुंबई, पुणे वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील 11वी प्रवेश कसे होणार?

अकरावी प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेला सुरूवात, पुण्यात कुठे आहेत मदत केंद्र, किती आहे कटऑफ? पाहा एका क्लिकवर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.