G20 Summit : G20 संमेलनात विदेशी पाहुणे, पुणे शहराशी काय आहे नाते
G20 Summit : नवी दिल्लीत G20 परिषद सुरु झाली आहे. या परिषदेसाठी जगभरातील दिग्गज दिल्लीत दाखल झाले आहे. यामधील तीन जण भारतीयांसाठी विशेष आहे. त्या तिघांचे भारताशी नाते आहे. पुणे शहराशी नाते असणारेही आहेत.
पुणे | 9 सप्टेंबर 2023 : नवी दिल्लीत शनिवारपासून G-20 परिषद सुरु झाली. या बैठकीसाठी जगभरातील विविध देशांचे प्रमुख राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. या परिषदेसाठी नवी दिल्लीत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था आहे. दिल्ली पोलिसांचे ५० हजार जवान आणि इतर दलाचे ७० हजार जवान सुरक्षेसाठी तैनात केले गेले आहे. या वेळी विदेशातून आलेल्या तीन जणांवर सर्वाचे लक्ष लागले आहे. त्यात एकाचे नाते पुणे शहराशी आहे.
कोण आहेत विदेशातून आलेले तिघे
भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक G-20 परिषदेसाठी दाखल झाले आहे. त्याचे भारताशी खास नाते आहे. त्यांचे लग्न भारतीय उद्योगपती नारायण मूर्तीची मुलगी अक्षता हिच्याशी झाले आहे. ऋषी सुनक यांचा जन्म इंग्लंडमधील साऊदम्पटनमध्ये झाला. परंतु त्यांचे आजी, आजोबा भारतीय आहेत. सुनक यांचे वडील यशवीर केनियातून इंग्लंडमध्ये गेले. तर त्यांची आई उषा टांझानियातून ब्रिटनला गेल्या. पण ते मूळचे ब्रिटिशकालीन भारतातल्या पंजाब प्रांतातील आहेत.
हे ही भारतीय वंशांचे
G-20 परिषदेसाठी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ हे भारतीय वंशाचे आहे. त्यांचे वडील भारतीय वंशाचे होते. त्यांच्या अजोबांचे वडील 1870 मध्ये उत्तर प्रदेशातील बलियामध्ये राहत होते. त्यांनी त्यांचे वडील आणि मॉरिशसचे माजी पंतप्रधान अनिरुद्ध यांच्या अस्थींचे विसर्जन 2022 मध्ये वाराणसीत केले होते. त्यावेळी त्यांनी काशी विश्वनाथ धाममध्ये जाऊन पुजाही केली होती.
अजय बंगा यांचे पुणे शहराशी नाते
जागतिक बँकेचे प्रमुख ६३ वर्षीय अजय बंगा G-20 परिषदेसाठी आले आहेत. त्यांचा जन्म पुणे शहरात झाला. त्यांचे वडील हभजनसिंग बंगा भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल होते. अजय बंगा यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे मूळ कुटुंब पंजाबमधील जालंधरचे होते. यामुळे पुणे शहरात जन्म झालेला व्यक्ती जागतिक बँकेचा सर्वोच्च पदावर गेला आहे आणि आता G-20 परिषदेसाठी दिल्लीत आला.अजय बंगा यांनी 1981 मध्ये नेस्ले कंपनीतून आपल्या करियरची सुरुवात केली.