Pune News : कोकणमधील लोकांसाठी चांगली बातमी, गणेशोत्सवासाठी तीन स्पेशल रेल्वेची भेट, संपूर्ण वेळापत्रक
pune news : पुणे रेल्वे स्थानकावरुन कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्यांमुळे पुणे ते कोकण असा प्रवास आरामदायी होणार आहे. रेल्वेचा पर्याय नसता तर घाट मार्गाने कोकणात पुण्यावरुन जावे लागते.
पुणे | 28 ऑगस्ट 2023 : गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. कोकणातील रहिवाशी गणोशोत्सवात गावी जातात. त्यांना रेल्वेने चांगली बातमी दिली आहे. गणेशोत्सवात त्यांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय पुणे रेल्वेने घेतला आहे. यामुळे पुणे शहरातून कोकणात जाण्यासाठी बस प्रवासाशिवाय रेल्वेचा आरामदायक प्रवास करता येणार आहे. या गाड्यांच्या तारखा आणि वेळेपत्रकही पुणे रेल्वे विभागाने जाहीर केले आहे.
कधी असणार विशेष रेल्वे
पुणे रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सव कोकणातील लोकांना गावी जाता यावे यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येतात. त्यासाठी ‘गणपती विशेष रेल्वे गाड्या’ गेल्या काही वर्षांपासून चालवल्या जात आहेत. मुंबईनंतर आता पुणे विभागामधून कोकणसाठी विशेष गाड्या सुटणार आहे. १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी या विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.
गाड्यांना कुठे असणार थांबा
पुणे रेल्वे स्थानकावरुन सुटणाऱ्या गाड्यांना पुणे, लोणावळा, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, सावरडा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
काय आहे वेळापत्रक
- पुणे-कुडाळ ही विशेष रेल्वेगाडी १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी पुणे स्थानकामधून सुटणार आहे. ही गाडी सायंकाळी ६.१५ वाजता सुटणार आहे.
- परतीच्या प्रवासासाठी कुडाळवरुन पुणे अशी विशेष रेल्वे १७ आणि २४ सप्टेंबर त्यानंतर एक ऑक्टोबर रोजी धावणार आहे. ही रेल्वे कुडाळ स्थानकातून दुपारी ४.०५ वाजता सुटणार आहे.
मुंबईवरुन एक लाख भक्तांचे तिकीट कन्फर्म
पुणे रेल्वे स्थानकप्रमाणे मुंबईवरुन विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहे. मुंबईवरुन जाणाऱ्या रेल्वेसाठी 1 लाख 4 हजार गणेश भक्तांची तिकीट एक कन्फर्म झाले आहे. त्या माध्यमातून रेल्वेला 5 कोटी 13 लाखांची कमाई झाली आहे. यंदा 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होतो. त्यासाठी मोठ्या संख्येने कोकणवासीय गावी जाणार आहेत.