रणजित जाधव, पुणे | 25 जुलै 2023 : पुणे शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांची चांगलीच कंबर कसली आहे. विविध प्रकारच्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात आहे. कोयता गँगवर कारवाई सुरु आहे. अट्टल गुन्हेगारांना मोकोका लावला जात आहे. कोबिंग ऑपेरशन करुन गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार स्वत: रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर गुन्हेगारी कमी होत नाही. परंतु पोलिसांच्या धडक कारवाया सुरु आहेत. आता मोबाईल चोरणारी टोळी पोलिसांनी पकडली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत देहू रोड परिसरात हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीला पकडण्यात आले. या टोळीतील दोघांसह त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पकडण्यात पोलिसांना यश आलेय. नागेश भंडारी आणि एका तरुणीसह दोन अल्पवयीन आरोपीच्या टोळीकडून 19 मोबाईल आणि पाच रिक्षा असा आठ लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीने पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक भागात मोबाईल आणि रिक्षा चोरी केली होती. उघडकीस आले अधिक तपास पोलीस करत आहेत
पोलिसांनी पकडलेली टोळी रस्त्याने जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकवून पळ काढत होती. लोकांच्या हातात मोबाईल असताना किंवा फोनवर बोलत असताना मोबाईल लंपास करत होते. या प्रकरणी अनेकांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. काही दिवसांपासून पोलीस त्यांच्यावर पाळत ठेऊन होते. आरोपी तेच असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडून मोबाईल चोरीचे इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
आरोपींना न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कोठडी घेण्यात येणार आहे. त्यानंतर चौकशीत अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.