गरबा खेळता-खेळता मृत्यूने गाठलं, सुन्न करणारा व्हिडीओ, पुण्यातली मन हेलावणारी घटना, VIDEO व्हायरल

गरबा खेळत असताना अशोक माळी यांना अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे ते गरबा खेळता-खेळता जमिनीवर कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अशोक माळी यांच्या मृत्यूची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

गरबा खेळता-खेळता मृत्यूने गाठलं, सुन्न करणारा व्हिडीओ, पुण्यातली मन हेलावणारी घटना, VIDEO व्हायरल
गरबा खेळता-खेळता मृत्यूने गाठलं, सुन्न करणारा व्हिडीओ, पुण्यातली मन हेलावणारी घटना
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 9:57 PM

‘आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर, अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर’, हे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतले बोल किती खरे आहेत. आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा. कुणाचं कधी काय होईल? याचा काहीच भरोसा नाही. त्यामुळे आहे तो क्षण जगायला हवा. पुण्यात प्रसिद्ध गरबा किंग म्हणून ख्यातनाम असलेले कलाकार अशोक माळी यांच्या मृत्यूने अनेकांच्या मनाला चटका दिला आहे. अशोक माळी पुण्यातील चाकण येथे एका गरबा कार्यक्रमात गेले होते. यावेळी गरबा खेळत असताना अशोक माळी यांना अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे ते गरबा खेळता-खेळता जमिनीवर कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अशोक माळी यांच्या मृत्यूची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

संबंधित घटनेचा व्हिडीओ अतिशय हृदयद्रावक आणि मन हेलावणारा आहे. या व्हिडीओत अशोक माळी खूप आनंदाने एका चिमुकल्यासोबत गरबा खेळताना दिसत आहेत आणि अचानक ते जमिनीवर कोसळतात. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आलं. अशोक माळी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील होळ गावाचे रहिवासी होते. अशोक माळी यांचे मित्र तथा खान्देश साहित्य संघाचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चौधरी यांनी संबंधित घटनेवर फेसबुक पोस्ट टाकत दु:ख व्यक्त केलं आहे.

जितेंद्र चौधरी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणाले?

“शरीरयष्टी छोटी पण आपल्या कलाकारीने कष्ट करून आपली उंची वाढवून समाजात एक आदर्श निर्माण करणाऱ्या अशोक माळी हे होळ ता. शिंदखेडा जि. धुळे येथील रहिवासी होते सध्या पुण्याला चाकण येथे राहत होते. अशोक माळी आणि डान्स हे खान्देशाच्या मातीतील हुकमी समीकरण होते. ऊन, वारा, पाऊस याच्यातून तावून सुलाखून निघालेलं व्यक्तिमत्व म्हणजे अशोक माळी. एखाद्या तलावात एखादा दगड टाकावा त्याच्यातून हजारो तवंग उठावेत अशा आठवणी त्यांच्याविषयी आहेत”, असं जितेंद्र चौधरी म्हणाले.

“2015 साली भोसरी येथे गरबाची मोठी स्पर्धा आयोजित केली होती. हजारो युवक आणि युवती यांनी भाग घेतला होता. दहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक कलाकाराचा कस लागला होता. पण हार मानेल तो अशोक माळी कसला? शेवटच्या दिवसापर्यंत बहाद्दर एलीमेनेट होतच नव्हता. सर्व युवक युवती अशोक माळी यांचा अंगात विज संचारलेलं दांडिया नृत्य पाहण्यासाठी तोबा गर्दी करत होते. अशोकचे लिलया स्टेप्स पाहून परीक्षकांनी तोंडात बोटं घातली होती. आणि निकाल लागला. दांडिया किंग 2015 अशोक माळी. या निमित्ताने त्यांना i smart टू व्हीलर भेट म्हणून आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते देण्यात आली”, अशी आठवण जितेंद्र चौधरी यांनी सांगितली.

“गेल्या पाच वर्षापासून ते कोचच्या भूमिकेत गेले होते. अनेक तरुण-तरुणी आणि लहान मुले यांना गरबा आणि दांडिया हे शिकवत राहिले. अहिराणी गाण्यावर सुद्धा ते अप्रतिम नाचत होते. वेगवेगळ्या मंडळे आणि सोसायटी यांच्याकडून त्यांना आमंत्रणे येत होते. आज आमच्या सोसायटीत त्यांना गरबा शिकविण्यासाठी आमंत्रण दिले होते. काल रात्री त्यांना फोन केला असता वहिनीसाहेबांनी फोन रिसिव्ह केला. कारण अशोक माळी राजगुरूनगर येथे दांडिया खेळण्यासाठी जात होते. ते गाडी चालवीत असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही”, अशी खंत जितेंद्र चौधरी यांनी व्यक्त केली.

“भावेश हा त्यांचा मुलगा तो ही उत्तम डान्सर. तो सावलीसारखा त्यांच्याजवळ असायचा. त्याचे पदलालित्य पाहून प्रेक्षक थक्क होऊन जायचे. काल राजगुरूनगर येथे दांडिया खेळत असतांना त्यांचे निधन झाले. आपण म्हणतो ना सोबत काय घेऊन जाणार आहे? अशोक माळी गुजराती पेहराव आणि दोन दांडिया आणि दांडिया किंग ही उपाधी सोबत घेऊन गेले”, असं जितेंद्र चौधरी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ :

'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज.
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'.
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार.
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या.
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?.
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?.
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?.
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले..
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले...
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा.