Pune garbage : राष्ट्रीय महामार्ग की ‘कचरा’मार्ग? पुण्यातल्या ‘या’ ठिकाणी साठणाऱ्या कचऱ्यामुळे वाहतुकीस होतोय अडथळा
पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal corporation) हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर जवळपास नऊ ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठले आहेत. मुख्य महामार्गालगत तसेच महार्मागाच्या सेवा रस्त्यावर हे कचऱ्याचे (Garbage) ढीग साठले असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal corporation) हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर जवळपास नऊ ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठले आहेत. मुख्य महामार्गालगत तसेच महार्मागाच्या सेवा रस्त्यावर हे कचऱ्याचे (Garbage) ढीग साठले असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे तातडीने या ठिकाणचा कचरा हटविण्यात यावा, असे पत्र (Letter) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महापालिकेला देण्यात आले आहे. हा महामार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीतून बालेवाडीपासून नऱ्हेपर्यंत जातो. या रस्त्यात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे परिसर तर अस्वच्छ झालाच आहे, शिवाय परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. शिवाय वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. या पूर्वीही महामार्ग प्राधिकरणाकडून महापालिकेस अशा ठिकाणांची यादी दिली होती. मात्र, नेमकी ठिकाणे कळविण्यात यावीत, असे प्राधिकरणास कळविले होते.
कचरा टाकण्यात येणाऱ्या जागांचे सर्वेक्षण
प्राधिकरणाकडून नुकतेच कचरा टाकण्यात येणाऱ्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर या सर्व ठिकाणींची यादीच महानगरपालिकेला पाठविण्यात आली आहे. महत्त्वाच्या नऊ ठिकाणांची ही यादी आहे. महापालिका आता किती कालावधीत हा कचरा हटवते ते पाहावे लागणार आहे.
महामार्गावर कुठे टाकला जातोय कचरा?
*नऱ्हे स्मशानभूमीजवळ *भूमकर चौक नऱ्हे सेवारस्ता *नवले पूल सेवारस्ता दोन्ही बाजू *मुठा नदीकाठ, वारजे *वेदभवन, चांदणी चौक *एचईएमआरएल सर्व्हिस रस्ता *सुतारवाडी सेवारस्ता दोन्ही बाजू *सूस, पाषाण पुलाजवळ