Gautami Patil | सबसे कातील गौतमी पाटील क्रिकेटच्या मैदानात, लीगमध्ये नृत्याचा Video व्हायरल

Gautami Patil | राज्यात गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे अनेक ठिकाणी बंदोबस्त लावून कार्यक्रम घेतले जात आहेत. वाढदिवस, लग्नाचे रिसेप्शन यासारख्या कार्यक्रमात नृत्य करणारी गौतमी पाटील हिने क्रिकेटच्या सामन्याप्रसंगी नृत्य केले. यामुळे क्रिकेट आणि नृत्य असा दुहेरी आनंद प्रेक्षकांना मिळाला.

Gautami Patil | सबसे कातील गौतमी पाटील क्रिकेटच्या मैदानात, लीगमध्ये नृत्याचा Video व्हायरल
Gautami Patil
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 1:06 PM

सुनील थिगळे,शिरूर, पुणे, दि.16 जानेवारी 2024 | सबसे कातिल गौतमी पाटील… हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात गाजला आहे. गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आणि गर्दी हे समीकरणच झाले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गौतमी पाटील हिचे कार्यक्रम झाले आहेत. शहरांमध्ये नव्हे तर ग्रामीण भागातही कार्यक्रम होत आहेत. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे बंदोबस्त लावून कार्यक्रम घेतले जात आहेत. आतापर्यंत सार्वजनिक कार्यक्रम, वाढदिवसानिमित्तही गौतमी पाटील हिला बोलावले जात आहे. मात्र आता गौतमी पाटील प्रथमच क्रिकेटच्या मैदानात थिरकली आहे. क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये तिने भन्नाट नृत्य केले आहे. पुणे जिल्ह्यात तिचा हा कार्यक्रम झाला आहे.

प्रीमियर लीगमधील सामन्यांत नृत्य

गौतमी पाटील चक्क क्रिकेटच्या मैदानात थिरकलीय आहे. यापूर्वी गौतमी पाटील वाढदिवस, लग्नाचे रिसेप्शन यासारख्या कार्यक्रमात नृत्य करताना दिसली. मात्र पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे क्रिकेटच्या मैदानावर गौतमी पाटील आली. तिने शिरूर प्रीमियर लीगमधील सामन्यांत नृत्य केले. या क्रिकेट प्रीमियर लीगच्या फायनल सामन्याच्या शेवटच्या दिवशी गौतमी पाटील हिला बोलवण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तिने नृत्य केले. यावेळी प्रेक्षकांना क्रिकेटसोबत गौतमी पाटील हिच्या नृत्याचा आनंद मिळाला. गौतमी पाटील हिने प्रथमच एखाद्या क्रिकेट सामन्याच्या वेळी नृत्य केले. तिच्या या कार्यक्रमामुळे क्रिकेट आणि नृत्य असे दोन्ही आनंद प्रेक्षकांना मिळाले.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओ व्हायरल

गौतमी पाटील हिचा क्रिकेट सामन्याच्या लीगमध्ये नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कॉमेंट येत आहे. क्रिकेट लीगमध्ये गौतमी पाटील हिला बोलवण्याची कल्पना अनेक नेटकऱ्यांना आवडली आहे.

गौतमी पाटील हिचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला होता. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रचंड गोंधळ झाला. यामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना गोंधळ करणाऱ्यांना ठोका, असे आदेश व्यासपीठावरुन दिले. गोंधळ करणारे ठाकरे गटातील लोक असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला होता. एकेकाळी ऑर्केस्ट्रामध्ये अदाकारा म्हणून काम करणारी गौतमी पाटील हिच्या लोकप्रियतेमुळे गर्दी होते आणि प्रचंड गर्दीमुळे गोंधळ होतो.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.