पुन्हा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात राडा, पोलिसांना करावी लागली मध्यस्थी
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे वेताळेश्वर महाराजांच्या यात्रेत गौतम पाटील हिचा कार्यक्रम होता. यावेळी सुरुवातीला कार्यक्रम शांततेत सुरु होता.
सुनिल थिगळे, खेड, पुणे : रिलस्टार म्हणून प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद एक समीकरण बनले आहे. कधी तिने केलेल्या डन्सवरुन वाद निर्माण होतो. कधी तिच्या चेंजिंग रुममध्ये चोरुन चित्रीकरण करण्याच्या वाद येतो. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात गोंधळ होतो. यामुळे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आणि वाद हे समीकरणच बनले आहे. गौतमी पाटीलने तिच्या आदाकारीने सोशल मीडिया आणि तरुणाईवर मोहिनी घातली आहे. अल्पवधीत मिळालेल्या प्रसिद्धीनंतर वादापासून मात्र तिची सुटका होत नाही.
गौतमी पाटील हिचा कार्यक्रम नेहमीच वादाच्या भोवऱ्यात दिसतात. आता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे वेताळेश्वर महाराजांच्या यात्रेत तिचा कार्यक्रम होता. यावेळी सुरुवातीला गौतमीचा कार्यक्रम शांततेत सुरु झाला. रिमिक्स गाण्यांवर तरुणाई गौतमीसमोर चांगलीच थिरकली होती. हा प्रकार इथच थांबला नाही तर या कार्यक्रमात तरुणांनीही एकमेकांच्या खांद्यावर बसून डान्स सुरु केला.त्यानंतर या तरुणाईने कार्यक्रमात चांगलाच धुडगुस घातला. यावेळी कार्यक्रम बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा गाणं लावण्यावरुन स्टेज समोरच तरुण एकमेकांवर भिडले. अखेर राजगुरुनगर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. अन् कार्यक्रम संपल्याचे आयोजकांना जाहीर करावं लागलं.
त्या व्हिडिओवरुन वादळ
गौतमी पाटील हिचा चेजिंग रुममधला एक व्हिडीओ समोर आला. संबंधित व्हिडीओ तिला नकळत तयार करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
मागील आठवड्यात नगरमध्ये राडा
नगरमध्ये गौतमीची लावणी सुरू असताना काही अतिउत्साही तरुणांनी तिच्यावर नोटांची उधळण केल्याने सुरूवातीला 15 मिनटे कार्यक्रम थांबवावा लागला. गर्दी नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. मात्र तरीही हुल्लडबाजी सुरूच राहिल्याने कार्यक्रम आटोपता घेत मोठ्या बंदोबस्तात गौतमीला तेथून बाहेर काढावे लागले.
बहिरवाडीत गोंधळ
बहिरवाडीतल्या कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातील शेकडो तरुण आले होते. त्यामुळं चांगलीचं गर्दी झाली होती. गर्दीला आवरणं आयोजकांच्या हाताबाहेर गेलं होतं.महिलांना हातात काठ्या घेऊनही तरुण काही ऐकत नव्हते. त्यामुळं धुडगूस घालणाऱ्या तरुणांना अखेर पोलिसांचीच भीती दाखविली. गौतमीच्या अदांवर राज्यातील अनेक तरुण फिदा आहेत. १०-२० किलोमीटरवर कुठंही गौतमीचा कार्यक्रम असला, तर तरुणांची पाऊलं त्या कार्यक्रमाकडं वळतातचं. गौतमीचा कार्यक्रम आणि तरुणांचा धूडगूस हे आता समीकरणचं झालं.