Gautami Patil Dance | गौतमीच्या कार्यक्रमात महिला काठ्या घेऊन उभ्या राहिल्या
अल्पवधीत प्रसिद्धीस आलेल्या गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आपल्या गावात व्हावा यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. परंतु तिच्या कार्यक्रमात अनेकदा तरुण हुल्लडबाजी करता. यामुळे बंदोबस्त असतानाही गोंधळ होतो. परंतु पुणे जिल्ह्यातील कार्यक्रम शांततेत झाला.
सुनील थिगळे, नारायणगाव, पुणे : आपल्या अनोख्या शैलीमुळे अल्पवधीतच प्रसिद्धीस आलेली गौतमी पाटील हिच्या नृत्याचे अनेक जण चाहते आहेत. यामुळेच तिचा कार्यक्रम आपल्या गावात व्हावा यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. तिच्या कार्यक्रमात अनेकदा तरुण हुल्लडबाजी करता. यामुळे बंदोबस्त असतानाही गोंधळ होतो. काही ठिकाणी तिचे कार्यक्रम थांबवण्याची वेळ आली होती. परंतु जुन्नर तालुक्यात गौतमी पाटील हिचा कार्यक्रम कोणत्याही गोंधळविना पार पडला. यामुळे गौतमी पाटील हिच्या या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
का झाला नाही गोंधळ
आघाडीची नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात अनेक वेळा गोंधळ झाला आहे. परंतु गुरुवारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कार्यक्रम शांततेत झाला. निमदरी गावाजवळील पिराचीवाडी येथील वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला. यावेळी डीजेच्या उत्साहात तिचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ७० ते ८० हजार नागरीक आले होते. परंतु कोणताही गोंधळ झाला नाही. शांतपणे हा कार्यक्रम पार पडला. त्याचे श्रेय जाते या ठिकाणावरील आदिवासी भगिनींना. कारण या ठिकाणाची सुरुक्षा येथील आदिवासी महिला भगिनींसह काही महिलांनी सांभाळली. या सर्व महिलांच्या हातात काठ्या व दांडकी होते. त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
स्टेजच्या समोर महिला रसिक
गौतमी पाटील हिचे वैयक्तिक काही सुरक्षा रक्षक तर खाजगी कंपनीचे सुमारे २५ बाऊन्सर तैनात करण्यात आले होते. याशिवाय जुन्नर पोलीस स्टेशनचा स्टाफ देखील बंदोबस्तासाठी तैनात होता. एवढेच नव्हे तर स्टेजच्या समोरच तरुणांची मोठी गर्दी होते म्हणून तेथे महिला रसिकांना बसविण्यात आले होते. त्यामुळेच कोणताही अनुचित प्रकार न घडता किंवा गोंधळ गडबड न होता जुन्नर तालुक्यात गौतमीचा कार्यक्रम शांततेत पार पडला. पिराचीवाडी येथील वेताळेश्वर यात्रेत सुमारे पन्नास हजार पेक्षा जास्त रसिक प्रेक्षक असताना देखील गौतमीचा कार्यक्रम शांततेत पार पडला.
बहिरवाडीत महिलांकडे होती सुरक्षा
पुणे जिल्ह्यातील बहिरवाडी गावात गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात महिलांची सुरक्षा होती. त्यावेळी काही तरुण गोंधळ घालण्याचे प्रयत्न करत होते. परंतु गावातील महिलाच दंडूके घेऊन पुढे आल्या आणि कार्यक्रम शांततेत पार पडला. या ठिकाणी हुल्लडबाज तरुणांना महिलांनी दांडक्याने चांगलाच चोप दिला होता.