Gautami Patil | ‘साहजिक आहे, कुणालाही आरक्षण पाहिजे तर…’; गौतमी पाटील मराठा आरक्षणावर नेमकं काय म्हणाली?

राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे. असं असताना आता डान्सर गौतमी पाटील हिने मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी पाटील हिलादेखील मराठा आरक्षण हवं आहे.

Gautami Patil | 'साहजिक आहे, कुणालाही आरक्षण पाहिजे तर...'; गौतमी पाटील मराठा आरक्षणावर नेमकं काय म्हणाली?
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 6:31 PM

पुणे | 13 डिसेंबर 2023 : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. यासाठी त्यांनी अनेकदा उपोषणदेखील केलंय. मनोज जरांगे हे जालन्याच्या अंतरवली सराटी गावात उपोषणाला बसले होते. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याची घटना समोर आली होती. या लाठीचार्जमध्ये अनेक गावकरी जखमी झाले होते. संबंधित घटनेचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा जास्त पेटला. सरकारकडून सध्या निजामकालीन कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरु आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कायदेशील लढाई लढण्याचं काम सरकारकडून सुरु आहे. या दरम्यान डान्सर गौतमी पाटील हिने मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिलीय.

गौतमी पाटील नेहमी कोणत्या ना कोणक्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी ती तिच्या डान्स स्टेप्समुळे चर्चेत असते, तर कधी तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असते. गौतमीच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी आणि त्या गर्दीत होणारे गोंधळ हे नेहमी चर्चेला कारण ठरले आहेत. तरीही गौतमी ही लाखो तरुणांची चाहती बनली आहे. तिला सोशल मीडियावर अनेकजण फॉलो करतात. तिच्या डान्सचं कौतुक करतात. याच गौतमीने आता मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. गौतमीला सुद्धा मराठा आरक्षण हवं आहे.

गौतमी मराठा आरक्षणावर नेमकं काय म्हणाली?

गौतमी पाटील ही मूळची खान्देशातील चोपडा तालु्क्यातील वेळोदे आहे. खान्देशात खरंतर शेती करणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जातं. गौतमीचे वडील शेतकरी होते. त्यामुळे तिला कोणतं जात प्रमाणपत्र मिळेल? हा तिचा वैयक्तिक मुद्दा आहे. पण तिने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपल्याला आणि मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, असं म्हटलं आहे. “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. म्हणजे साहजिक आहे. आज अनेकांना आरक्षण हवंय तर ते मिळालेच पाहिजे. मला देखील आरक्षण हवंय. मला देखील कुणबी प्रमाणपत्र हवंय”, असं गौतमी पाटील म्हणाली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.