‘…तर मी ऐकून घेणार नाही’, गौतमी पाटील हिचा घनश्याम दरोडे याला इशारा

नृत्यांगना गौतमी पाटील हिने अखेर घनश्याम दरोडे याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचा छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनश्याम दरोडे हा सातत्याने गौतमीवर टीका करताना दिसतोय. त्याने आज तर गौतमीला थेट बिहारमध्ये जाण्याचा इशारा दिलाय. त्यावर गौतमीने प्रत्युत्तर दिलं आहे.

'...तर मी ऐकून घेणार नाही', गौतमी पाटील हिचा घनश्याम दरोडे याला इशारा
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 11:26 PM

पुणे : खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसनिमित्ताने नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटील हिने ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. दिलीप मोहिते पाटील यांनी गौतमीचं कौतुक केलं. त्यानंतर गौतमीने दिलीप मोहिते यांचे आभार मानले आहेत. दिलीप मोहिते यांना आपण आज पहिल्यांदाच भेटलो, त्यांनी कलाकाराची जाण राखली, असं गौतमी पाटील म्हणाली. यावेळी गौतमीला महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे याने केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गौतमीने सडेतोड उत्तर दिलं.

“मी घनश्यामला एकच सांगते, तू आधी माझ्या कार्यक्रमाला ये. माझा कार्यक्रम बघ. त्यानंतर काही आरोप करायचे असतील तर कर. आधी मला दाखव की मी काय चुकतेय. तू डायरेक्ट माझ्यावर आरोप करशील तर मी सुद्धा ऐकून घेणार नाही. माझी चूक दिसू तर दे. तू आधी कार्यक्रम बघ मग बोल”, अशी शब्दांत गौतमीने घनश्याम दरोडेला उत्तर दिलं.

बीडच्या तरुणाच्या पत्रावर गौतमी काय म्हणाली?

बीडमधील एका तरुणाने गौतमी पाटील हिला पत्र लिहित लग्नाची मागणी घातलीय. त्यावर गौतमीला प्रश्न विचारला असता आपल्याला त्याबाबत माहिती नाही, असं गौतमीने सांगितलं. “माझी सध्या तरी लग्नाची इच्छा नाहीय. मी ज्यावेळेस लग्न करेन त्यावेळी आपल्याला कळवेन”, असं गौतमी पाटील म्हणाली.

हे सुद्धा वाचा

संभाजीराजेंच्या भूमिकेवर गौतमी काय म्हणाली?

“माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या वक्तव्याबाबतची माहिती नाहीय. मी बघून आपल्याला पुढे सांगेन. पण त्यांच्याबाबत मी काही बोलू शकत नाही. त्यांना मी सुद्धा मानते. पण कार्यक्रमात अश्लील झालं असतं तर कार्यक्रमाला मी आले नसते. आधी बघा मग बोला”, अशी भूमिका गौतमी पाटील हिने मांडली.

घनश्याम दरोडे गौतमी पाटील हिच्याबद्दल नेमकं काय म्हणाला?

“महाराष्ट्र चांगला घडवायचा असेल तर महाराष्ट्राची संस्कृती राखली पाहिजे. गौतमी पाटील यांनी पाटील आडनाव लावावे. त्याला माझा विरोध नाही तर त्या ज्या पद्धतीने अदा करतात, त्याला माझा विरोध आहे. पाटील आडनाव लावण्याचा ज्याला त्याला पूर्ण अधिकार आहे. गौतमी पाटील यांना आडनावरून कोणी विरोध करू नये, आपले अधिकार आपण ठरू शकतो”, असं घनश्याम म्हणाला.

“गौतमी पाटील यांचं पाटील आडनाव काढण्याचा कोणी प्रयत्न कोणी करत असेल तर मी गौतमी पाटील यांच्या पाठीमागे मी उभा असेल. 9 तारखेनंतर मी गौतमी पाटील यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्राच्या वतीने त्यांना समजून सांगणार आहे. त्यांना बदल करायला सांगणार आहे. महाराष्ट्र चांगला घडवायचा असेल तर महाराष्ट्राची संस्कृती एक राहिली पाहिजे”, असंदेखील तो यावेळी म्हणाला.

“मी गौतमी पाटील यांना ओपन चॅलेंज करतो, त्यांनी आमचा मुसंडी सिनेमा पाहावा, तेव्हा तुम्हाला कळेल महाराष्ट्राची संस्कृती काय आहे. गौतमी पाटील यांना बोलण्यात काही अर्थ राहिला नाही, बोलून काही त्या प्रतिसाद देत नाही. आता 9 जून नंतर मी त्यांची भेट घेणार आहे”, असं घनश्यामने सांगितलं.

“आता ताईला समजून सांगणे गरजेचे आहे, नाहीतर मी ताईला ओपन चॅलेंज देतो त्यांनी बिहारमध्ये जावं. तुम्ही बदल करणार नसाल तर महाराष्ट्रात तुम्हाला थारा नाही. गौतमी पाटील यांची महाराष्ट्रात जास्त दिवस हवा राहणार नाही. कारण तुम्ही पोरांना वेगळ्या वळणाला लावत आहे, वाईट वळण लावत आहे”, असा आरोप घनश्यामने केला.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.