दोघे मित्र बनले, एकमेकांवर प्रेम करु लागले, संबंधास नकार देताच काटा काढला

Pune Crime News | पुणे शहरात MPSC टॉपर दर्शना पवार हिचा प्रेम प्रकरणातून जून महिन्यात खून झाला होता. त्यानंतर एका वेगळ्या प्रेम प्रकरणातून मंगळवारी संध्याकाळी युवकाचा खून झाला. हा खून त्याचा मित्रानेच केला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके पाठवली आहे.

दोघे मित्र बनले, एकमेकांवर प्रेम करु लागले, संबंधास नकार देताच काटा काढला
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 2:46 PM

पुणे, दि. 29 नोव्हेंबर 2023 | पुणे शहरातून खुनाचा एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुणे वाघोली परिसरात एका महाविद्यालयीन युवकाचा खून झाला आहे. कोयत्याने वार करुन हा खून झाला आहे. खून करणारा त्या युवकाचा गे पार्टनर होता. समलैगिंक संबंधास नकार दिल्यानंतर हा खून झाला आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात हादरा बसला आहे. मृत युवकाचे नाव महेश साधू डोके असून खून करणारा त्याचा गे पार्टनर सागर गायकवाड आहे. सागर गायकवाड हा ठेकेदार आहे.

काय आहे प्रकरण

महेश डोके बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. तो कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच राहतो. हॉस्टेलजवळ राहणारा ठेकेदार सागर गायकवाड याच्याशी त्याची मैत्री झाली. थोड्याच काळात दोघांमध्ये समलैंगिक संबंध तयार झाले. काही दिवसांनी सागर गायकवाड याने महेश डोके याच्यासंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु महेश डोके याने नकार दिला. त्याचा राग सागर गायकवाड याला आला. मंगळवारी दुपारी दोन वाजता आरव ब्लिस सोसायटीच्या मैदानावर गायकवाड याने डोकेला गाठले. त्यानंतर कोयत्याने त्याच्या डोक्यावर आणि मानेवर वार केले आणि तो फरार झाला. महेश डोके याच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरु केली. त्याचवेळी महेश डोके याने समलैंगिक संबंध आणि आरोपी सागर गायकवाड याचे नाव सांगितले. महेश याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

आरोपीला शोधण्यासाठी टीम

या प्रकरणी कृष्णकांत कमलेश कुमार यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सागर गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली आहे. साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले आहे. जून महिन्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण दर्शना पवार हिचा खून तिचा मित्र राहुल हंडोरे हिने केला होता. तो खून प्रेम प्रकरणातून झाला होता.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.