Pune crime : माहिती अधिकार कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला; घोडेगाव पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या

गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Crime branch) पथकाला सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकाला आरोपींविषयी माहिती मिळाली आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या.

Pune crime : माहिती अधिकार कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला; घोडेगाव पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या
अटक केलेल्या आरोपींसह घोडेगाव पोलिसांचं पथकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 4:05 PM

पुणे : जिल्ह्यातील घोडेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते (RTI Activist) नंदकुमार बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्लाची सुपारी देणारे आणि हल्ला करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि घोडेगाव पोलिसांची (Police) जेरबंद केले आहे. घोडेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार उर्फ भाऊसाहेब बोराडे त्यांच्यावर 10 मार्च रोजी कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यात त्यांच्या डाव्या हाताची करंगळी तुटली होती. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Crime branch) पथकाला सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकाला आरोपींविषयी माहिती मिळाली आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. तर एक आरोपी अद्याप फरार असल्याचे समजते.

गोपनीय माहितीच्या आधारे तपास

गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्हे शाखेला माहिती मिळाली, की जितेंद्र प्रभाकर काळे याचे आडोसा नावाने नंदकुमार बोराडे यांच्या घराशेजारी परमिट रूम आणि बियर बार आहे. हा बियर बार बंद करण्याबाबत नंदकुमार बोराडे यांनी वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग व ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या तसेच जितेंद्र काळे यांनी बांधलेल्या रहिवाशी सोसायटीमधील सांडपाणी कॅनलमध्ये सोडले जाते. याबाबत नंदकुमार बोराडे यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याचा राग मनात धरून जितेंद्र प्रभाकर काळे याने सदरचा गुन्हा केलेला आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली.

अशी आखली जीवे मारण्याची योजना

गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, जितेंद्र काळे यास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता, त्याने त्याचा मुंबई येथील राहणारा त्याचा लहानपणीचा मित्र योगेश पवार व त्याचे इतर साथीदार यांनी मिळून नंदकुमार बोराडे याला मारण्याची योजना आखली. त्यानुसार जाफर शमीम अहमद (वय 24 वर्षे, रा. मुंब्रा, मुंबई) व शबाझ मेमन यांनी एक चार चाकी व एक दुचाकी गाडीतून येवून हल्ला केला केला असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यांमध्ये जितेंद्र प्रभाकर काळे, योगेश मोहन पवार (वय 40 वर्षे, रा. घाटकोपर, मुंबई) जाफर शमीम अहमद (वय 24, रा. मुंब्रा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यामध्ये अजून एक आरोपी फरार आहे.

पोलीस पथकाची कारवाई

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्यासह पथकाने केली. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई साठी घोडेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.