Gold Rate Pune | चांदीची ‘चांदी’ तिसऱ्या दिवशीही कायम! चांदीच्या दरात 600 रुपयांची वाढ तर सोनंही वाधारलं

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार देशातल्या बाजारपेठेतही सोन्या-चांदीच्या (Gold Silver Rate) दरात चढ-उतार पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस सतत घसरल्यानंतर या आठवड्यापासून सोन्याच्या (Gold Rate) दरात पुन्हा एकदा वाढ पहायला मिळत आहे.

Gold Rate Pune | चांदीची 'चांदी' तिसऱ्या दिवशीही कायम! चांदीच्या दरात 600 रुपयांची वाढ तर सोनंही वाधारलं
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 11:32 AM

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार देशातल्या बाजारपेठेतही सोन्या-चांदीच्या (Gold Silver Rate) दरात चढ-उतार पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस सतत घसरल्यानंतर या आठवड्यापासून सोन्याच्या (Gold Rate) दरात पुन्हा एकदा वाढ पहायला मिळत आहे. आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर हा 48 हजार 690 आहे. काल हा दर 48 हजार 660 होता. दुसरीकडे ऑनलाईन खरेदीसाठी सोन्याचा (Online Gold) दर प्रतितोळा 40 हजार 500 रुपयांच्या घरात आहे. (Gold and silver prices have been rising again in Pune since this week)

22 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर हा 45 हजार 700 ते 45 हजार 900 रुपयांच्या दरम्यान आहे. ऑनलाईन खरेदीसाठी यात काहीशी वाढ होऊ शकते.

चांदीची ‘चांदी’ कायम

आज सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात चांदीच्या दराने (Pune Silver Rate) विक्रमी उसळी घेतली आहे. आज पुण्यात चांदीच्या दरात तब्बल 600 रुपयांची वाढ झाली आहे. आज पुण्यात चांदीचा प्रतिकिलो दर हा 63 हजार 400 रुपयांवर गेला आहे. काल हा दर 62 हजार 800 रूपयांच्या घरात होता.

कालही पुण्यात चांदीच्या दरात प्रतिकिलो 800 रुपयांची वाढ झाली होती तर सोमवारी 300 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती. त्यानुसार गेल्या तीन दिवसांत चांदीचा दर तब्बल 1700 रुपयांनी वाढला आहे. मागच्या अनेक दिवसांतली ही मोठी वाढ आहे.

घरी ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर पैसे कसे कमवायचे?

जर तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने बँकेत ठेवायचे ठरवले तर तुम्हाला लॉकरचे शुल्क भरावे लागेल. तुमच्या घरी ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांमधून तुम्ही अधिक पैसे कमावू शकता, असा एक मार्ग आहे. तुम्ही निष्क्रिय सोने RBI ने नियुक्त केलेल्या बँकेत जमा करू शकता आणि त्यावर व्याज मिळवू शकता. आरबीआयच्या गोल्ड मॉनेटायझेशन योजनेअंतर्गत (Gold Monetisation Scheme) ही सुविधा उपलब्ध आहे. हे बँकेच्या मुदत ठेवीसारखे आहे, जिथे तुम्ही तुमचे घरी पडून असलेले सोने बँकेत जमा करता येते आणि मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला सोने किंवा सोन्याचे मूल्य जमा व्याजासह परत मिळते.

‘या’ बँका सेवा देताहेत

अलीकडे एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यासह अनेक बँका ट्विटरवर आरबीआयच्या गोल्ड मॉनेटायझेशन योजनेचा प्रचार करताना दिसत आहेत. एचडीएफसी बँकेने आपल्या ट्विटरवर लिहिले, “तुमच्याकडे असलेल्या निष्क्रिय सोन्याच्या दागिन्यांवर व्याज मिळवू शकता. एचडीएफसी बँक तुमच्या निष्क्रिय सोन्यावर (idle lying gold jewellery) जास्त व्याज देते. एचडीएफसी बँक गोल्ड मॉनेटायझेशन योजनेमध्ये गुंतवणूक करा, दीर्घ मुदतीच्या ठेवींवर 2.50% आणि मध्यम मुदत ठेवींवर 2.25% मिळवा. या योजनेंतर्गत सोन्याची किंमत मॅच्युरिटीच्या वेळी सध्याच्या किमतीवर आधारित असेल. सोन्याच्या ठेव मूल्यावर व्याज मोजले जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Gold Monetisation Scheme: आता घरी पडून असलेल्या सोन्यातून कमाईची संधी, जाणून घ्या मोदी सरकारची योजना

फेसबुक छोट्या व्यावसायिकांना देणार 50 लाखांपर्यंत कर्ज

देशातील सर्वात मोठा फ्लोटिंग सौर प्रकल्प; जो 7000 घरांना वीज आणि पाणी देणार, जाणून घ्या

वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.