परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण?; गोपीचंद पडळकरांचा सवाल
तुटपुंजा पगार आणि तोही वेळेत होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यातच महामंडळाला आवश्यक नसलेल्या गोष्टींसाठी टेंडर काढली जात आहेत. (gopichand padalkar slams maha vikas aghad)
सोलापूर: तुटपुंजा पगार आणि तोही वेळेत होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यातच महामंडळाला आवश्यक नसलेल्या गोष्टींसाठी टेंडर काढली जात आहेत. हे कुणाच्या टक्केवारीसाठी चाललं आहे? असा सवाल करतानाच परिवहन मंत्र्यांच्या महामंडळाताली सचिन वाझे कोण?, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. (gopichand padalkar slams maha vikas aghadi)
गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. मोठ्या विश्वासानं महाराष्ट्रातला प्रवासी आजही एसटीने प्रवास करतो. पण आपल्या त्यागानं व सेवेने एसटी महामंडळला मोठं करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची ही वेळ यावी ही राग आणि अपमान वाटणारी बाब आहे. एकतर तुटपुंजा पगार. त्याचाही वेळेवर पत्ता नाही… ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
हे सर्व कुणाच्या टक्केवारीसाठी?
महामंडळाला आवश्यकता नसणाऱ्या गोष्टींसाठी हजारो कोटींचे टेंडर काढ़ून खाजगी कंत्राटदारांची संपूर्ण देणी दिली जाते. पण कर्मचाऱ्यांचे मूलभूत पगार दिले जात नाहीत. हे सर्व कुणाच्या टक्केवारीसाठी चाललंय..? परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातला सचिन वाझे कोण?, असा सवाल करतानाच या सर्वांविरोधात ज्या युनियने आवाज उठवायला पाहिजे तेच आज प्रस्थापितांच्या तालावर नाचत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
21 सप्टेंबरला सांगलीत बैठक
पण माझं सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की, आपण कुठल्याही दबावाला न झुकता आपल्या हक्कासाठी लढा उभारा. मी तुमच्या पाठीशी खंबरीपणे उभा आहे. माझं राज्य सरकारकडे मागणं आहे की, ‘जे राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कामगारांना द्या ‘ अन्यथा अन्यथा संघर्ष अटळ आहे. या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या 21 सप्टेंबरला झरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आपण तिथे मोठ्या संख्येनं यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
धुळे जिल्ह्यातील साक्री येथे एसटी महामंडळात कमलेश बेडसे हे मागील कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांचा पगार अतिशय तुटपुंजा आहे. आधीच पगार कमी आणि तोही वेळेवर मिळत नसल्यामुळे साक्री आगारमधील राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी कमलेश बेडसे काही दिवसांपासून मानसिक तणावातून जात होते. तसेच कमलेश यांच्यावर कर्जदेखील वाढल्याने ते नैराश्यात गेले होते. शेवटी तुटपुंज्या पगारामुळे घरातील आर्थिक स्थिती खालावत गेल्यामुळे त्यांनी 27 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. महामंडळाविरोधात कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. तर दुसरीकडे जोपर्यंत कमलेश बेडसे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा बेडसे यांनी घेतला.
दरम्यान, बसमध्ये जास्तीत जास्त प्रवासी बसावेत तसेच जास्तीत जास्त भाडे मिळावे यासाठी शिवशाही आणि सामान्य बस कर्मचाऱ्यामध्ये चांगलाच वाद झाला. हा प्रकार औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर 27 ऑगस्ट रोजी घडला. औरंगाबाद शहरातील बसस्थानकावर एक सामान्य बस उभी होती. या बसमध्ये काही प्रवासी बसलेले होते. तेवढ्यात तिथे दुसरी शिवशाही बस आली. त्यानंतर शिवशाही बस भरण्यासाठी सामान्य बसमधील प्रवाशांना उतरवण्यात आले. नंतर याच प्रवाशांना शिवशाही बसमध्ये बसण्यास सांगितले गेले. याच कारणामुळे सामान्य बस आणि शिवशाही बसमधील कर्मचाऱी यांच्यात वाद पेटला. हा वाद नंतर विकोपाला गेला. त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी बसस्थानकावर अक्षरश: गोंधळ घातला. (gopichand padalkar slams maha vikas aghadi)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 Super Fast News | 19 September 2021 https://t.co/BdRdiXtpTa #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 19, 2021
संबंधित बातम्या:
“आमदार प्रणिती शिंदे लवकरच कॅबीनेट मंत्री होणार”
‘त्या’ घोरपडींच्या अवयवांचा काळ्या जादूसाठी वापर?; तिघे जेरबंद; कल्याण वनविभागाचा तपास सुरू
(gopichand padalkar slams maha vikas aghadi)