रोहित पवारांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत ‘पोस्टर बॉय’ बनवायचंय का?; पडळकारांचा सवाल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात असल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. (gopichand padalkar slams ncp over ahilya devi holkar memorial)

रोहित पवारांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत 'पोस्टर बॉय' बनवायचंय का?; पडळकारांचा सवाल
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 12:26 PM

पुणे: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात असल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यातील पई पाव्हण्यांचं सरकार अहिल्यादेवींच्या स्मारकांचा फक्त राजकारणासाठी वापर करणार असल्याचं दिसून येतंय. आधीची स्मारक समिती सूडबुद्धीने बरखास्त करण्यात आली आहे. या समितीत एकाच पक्षाचं वर्चस्व राहिलं आहे, अशी टीका करतानाच अहिल्यादेवी स्मारक उभारणीत तुम्हाला रोहित पवारांना पोस्टर बॉय बनवायचे आहे का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. (gopichand padalkar slams ncp over ahilya devi holkar memorial)

गोपीचंद पडळकर यांनी ये पब्लिक है, सब जानती है, या शिर्षकाखाली एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून पडळकरांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली आहे. सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच नाव विद्यापीठाला देण्यात यावं, अशी मागणी असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर बेगडी, नाटकी प्रेम दाखवणारे आघाडी सरकारचे निर्माते, दिग्दर्शक का गप्प होते?, असा सवाल पडळकर यांनी केला आहे.

पई पाव्हण्यांचं सरकार 

वर्षभरापासून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठात अहिल्यादेवींचा अश्वारुढ १८ फुटी पुतळा व्हावा म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यावर प्रेम करणारा बहुजन समाज सातत्याने प्रयत्न करत होता. या स्मारकासाठी एकूण ३ कोटींची मागणी आहे. त्यापैकी १.५ कोटी विद्यापीठ व १.५ कोटी सरकार असा निधी उपलब्ध करुन देणार होते. विद्यापीठाने १ कोटीचा निधी देण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी पाया खणून बांधकामाला सुरुवात केली. पण हे सरकार निधी देत न्हवतं. आता त्यांचे धाबे दणाणले आहेत. हे ‘पई पाव्हण्यांचं सरकार’ याही स्मारकाचा वापर फक्त राजकारणासाठी करतंय हे स्पष्टपणे दिसतंय, असा दावाही त्यांनी केला आहे.

रोहित पवारांना स्मारक समितीत स्थान का?

पहिली स्मारक समिती सुडबुद्धीने बरखास्त करुन आता या समितीत एकाच पक्षाचं वर्चस्व कसं राहिल? याची सोय लावलीये. स्मारकासाठी, नामांतरासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं. सोलापूरचा आणि रोहित पवारांचा काहीही संबंध नसताना त्यांना स्मारक समितीत स्थान दिलंय. आणि त्यांना समितीवर घेतल्या घेतल्या निधी मंजूर केला. म्हणजे रोहित पवारांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत तुम्हाला ‘पोस्टर बॉय’ बनवायचंय का?, असा सवालही त्यांनी केला.

पडळकरांचे सवाल

मुळात स्मारक समितीमध्ये राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते, राजकारणातील आदर्श भाई गणपतरावजी देशमुख यांचं नाव या समितीत सर्वात वर असायला हवे होते. देशमुख यांनी विधानसभेत ११ वेळा प्रतिनिधित्व केल. त्यांच नाव ७ नंबरला टाकून नेमक तुम्हाला काय साध्य करायच होत? मंत्री उदय सामंत यांना भेटताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे व अन्य सदस्य यांना का सोबत घेऊन गेला नाहीत?, असा सवालही त्यांनी केला. (gopichand padalkar slams ncp over ahilya devi holkar memorial)

हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही

रोहित पवारांचं धोरण म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उधार’… आपल्या नातवाला लाँच करण्याची कितीही धडपड? जिथं जिथं अहिल्यादेवींचं नाव आहे, तिथं तिथं तुम्ही श्रेय घ्यायला येतायेत. हे कालच्या जेजूरी गडाच्या प्रकरणावरून समस्त बहुजन समाजाला कळलं आहे. समस्त बहुजन समाजाने हा प्रस्थापितांचा डाव ओळखलाय, असं सांगतानाच पण एक लक्षात ठेवा… आता, साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही…अशी टीकाही त्यांनी केली. ज्येष्ठ दिवंगत कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळीतून पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. (gopichand padalkar slams ncp over ahilya devi holkar memorial)

संबंधित बातम्या:

अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचं अनावरण भोवलं, गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

पवारांसारख्या वाईट प्रवृत्तीद्वारे अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब; पडळकरांचा घणाघात

‘शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा’, पडळकरांचं राऊतांना पत्र

(gopichand padalkar slams ncp over ahilya devi holkar memorial)

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.