Pune | शासनाच्या उच्च व तंञ शिक्षण विभागाचा करंटेपणा? करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थींची सरकारकडूनच हेटाळणी ; काय आहे प्रकरण?

ज्या विद्यार्थ्यानी कोरोना काळात आपले आईवडील गमावले आहेत. अश्या विद्यार्थ्यांचे पदवी पदव्युत्तर शिक्षणसाठीची फी माफ करण्यात यावी. त्यानंतर शासनाने ३० जूनला याबाबतचे परिपत्रक काढत शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्याबाबतची पत्रेही सर्व कुलगुरूंना पाठवण्यात आली होती. हा निर्णय होऊन आठ महिने झाले . मात्र आद्यपाही कोणत्याही प्रकारची मदत या गरजू विद्यार्थ्यांना पोहचलेली नाही.

Pune | शासनाच्या उच्च व तंञ शिक्षण विभागाचा करंटेपणा? करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थींची सरकारकडूनच हेटाळणी ; काय आहे प्रकरण?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 12:28 PM

पुणे – कोरोना (corona)महामारीच्या काळात अनेक मुलांनी आपल्या पालकांना गमावल्याची घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर कोरोनामुळे पालकांना गमावलेल्या विद्यार्थीचे पदवीत्तर पर्यत शिक्षण पुर्ण करु असे आश्वासन राज्यशासन (state Government )दिले होते. त्याबाबतचे परिपत्रकही राज्य शासनाने काढले होते. मात्र कोरोना काळात पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांची माहिती राज्य सरकारकडं उपलब्ध नसल्याची माहिती आरटीआयमधून (RTI) समोर आले आहे. याबाबत स्टुडंट हेल्पींग हँड या विद्यार्थी संघटनेने माहितीच्या अधिकाराचा वापर करत राज्यातील याबाबत एकूण अर्जाची संख्या ,काँलेज व जिल्हानिहाय लाभार्थी यांची आकडेवारी ज्या विद्यार्थीचा शैक्षणिक खर्च माफ केला त्यांचा तपशील , करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थीची आकडेवारी, या योजनेची परीपञक द्यावे.अशी मागणी केली होती. मात्र या सर्व प्रश्नाला शासनाने केराची टोपली दाखवली आहे. याविषयी अहवाल अध्याप अप्राप्त असल्यामुळे माहीती देणे शक्य होणार नाही असे उत्तर शासनाने दिले आहे.

असा घेतला होता निर्णय

कोरोनाच्या काळात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 28 जून 2021रोजी सर्व विद्यापीठातील कुलगुरूंची बैठक घेतली होती. त्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता की , ज्या विद्यार्थ्यानी कोरोना काळात आपले आईवडील गमावले आहेत. अश्या विद्यार्थ्यांचे पदवी पदव्युत्तर शिक्षणसाठीची फी माफ करण्यात यावी. त्यानंतर शासनाने 30  जूनला याबाबतचे परिपत्रक काढत शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्याबाबतची पत्रेही सर्व कुलगुरूंना पाठवन्यात आली होती. हा निर्णय होऊन आठ महिने झाले . मात्र आद्यपाही कोणत्याही प्रकारची मदत या गरजू विद्यार्थ्यांना पोहचलेली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्य शासनाकडं याचा डेटाच उपलब्ध नसल्याने, ही मदत कशी पोहचवणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शासनाचा कर्मदरिद्रीपणा दिसून येतोय

यातुन एक स्पष्ट होते,शासनाचा कर्मदरिद्रीपणा व हालकटपणा दिसुन येतोय. करोनाच्या जागतिक महामारीने सर्वजणच अक्षरक्ष; होरपळुन गेले होते. आताही त्याच्या तीव्रतेच्या झळा सर्वानाच सोसाव्या लागतात. पण त्यात अधिकचा त्रास हा करोनामध्ये ज्या कुंटुबातील कर्ते लोक गमावले आहेत. त्यांना होत आहेत. शासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम गरजू पाल्याच्या भिविष्यावर होणार आहे. कोरोना काळात या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने लोकप्रिय घोषणा केली. मात्र त्यांनी त्याची अंमलबाजवणी का केली नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. असे मत स्टुडंट हेल्पींग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी व्यक्त केलं आहे.

Ukraine Russia Crisis : यूक्रेन रशिया वादासंदर्भात मोठी अपडेट, राष्ट्रपती जेलेंस्कीचा मॉस्कोला बैठकीचा प्रस्ताव,पश्चिमेच्या देशांनाही खडे बोल

उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या मतदानाला सुरुवात, ओमराजे निंबाळकर व राणाजगजीतसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

महाठग निशीद वासनिकला ठोकल्या बेड्या, नागपूरच्या पोलिसांची लोणावळ्यात कारवाई, गुंतवणूकदारांची कशी केली होती फसवणूक?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.