पुणे – विधान परिषद निवडणुकीत नागपूर आणि अकोल्यात मतं फुटल्यामुळे सरकारने विधानसभा अध्यक्ष पदासाठी नियम बदलले आहेत. सरकारला जरी भीती असली तरी नियम बदलून चालत नाही. 12 आमदारांच्या निलंबनाची केस प्रलंबित असताना अध्यक्ष पदाची निवडणूक घेणं चुकीचे आहे. बहुमताच्या जोरदार या सरकारने महाराष्ट्राची वाट लावलीय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या केवळ मुख्यमंत्री पदाची खुर्ची प्रिय आहे. महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षाही भयानक झालं आहे. त्यांच्या कामगिरीसाठी आता नवीन प्राणी शोधावा लागेल, असा घाणाघातही भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर केला आहे.
दादागिरी चालणार नाही
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परखड मत व्यक्त करत सरकारी सेवेत विलीनीकरणाचा प्रत्येकाचा हट्टपूर्ण होणार नसल्याचे नुकतेच अजित पवारांनी स्पष्ट केले. मात्र अजित पवार दादागिरीने एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न रेटण्याचा प्रयत्न करतायत,पण तसं चालत नाही. परखड मतांने सर्वच कामे होत नाहीत असा टोलाही पाटील यांनी पवार यांना लगावला आहे.
टीईटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत
म्हाडा, आरोग्य टीईटी परीक्षेत मोठा भष्ट्राचार झाला आहे. सगळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले आहेत टीईटी परिक्षा रद्द झाली पाहिजे. टीईटी परीक्षा पुन्हा नव्याने घेतली पाहिजे. या घोटाळ्याची सीबीआयचौकशी केल्यावर यात सहभागी असलेले अनेक मंत्री समोर येतील. म्हणूच महाविकास आघाडी सरकार सीबीआयची चौकशीला घाबरत आहे. भाजप कोणालाही पाठीशी घालणार नाही. या घोटाळ्यात आमचा कार्यकर्ता दोषी असेल तर त्यांना फाशीवर लटकवा असे मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केले आहे.
अटल संकल्प योजना राबवणार
माजी पंतप्रधान अटलजीची जयंती आहे. या निमित्ताने आम्ही अटल संकल्प योजना पुण्यात सुरु करणार आहोत. या या अटल दीड लाख घरापर्यंत आम्ही जाणार आहोत. त्या प्रत्येक घरात आम्ही पंतप्रधान मोदींच्या योजनाची माहिती प्रत्येक घरात सांगणार आहोत.
चारित्र्याच्या संशयातून साडीने गळा आवळून पत्नीची हत्या, आरोपी पतीला अटक