Maharashtra Election Result 2023 | बारामती तालुक्याचे ‘दादा’, अजित पवार की शरद पवार, निकाल आला समोर
Baramati Gram Panchayat Election 2023 Result | राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. बारामती तालुक्यात पहिला निकाल आला आहे. हा निकाल अजित पवार यांच्यागटाकडे गेला आहे. या ठिकाणी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात सरळ लढत होती.
अभिजित पोते, बारामती, पुणे | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरु झाली आहे. बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीस सुरवात झाली आहे. बारामती तालुक्यातील भोंडवे वाडी ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे आली आहे. या ठिकाणी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात सरळ लढत होती. अजित पवार गटाकडे ग्रामपंचायत आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. अजित पवार यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. बारामतीमधील दुपारी १२.३० पर्यंत आलेल्या २५ निकालापैकी २४ ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे गेल्या आहेत. म्हसोबानगर, पवईमाळ, पानसरे वाडी, आंबेवाडी आणि भोंडवे वाडी या ग्रामपंचायतीत अजित पवार यांच्या गटाला यश आले आहे.
काटेवाडी ग्रामपंचायतीकडे का आहे लक्ष
बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी झाली. तालुक्यातील 1 ग्राम पंचायत बिनविरोध झाली होती. तालुक्यात सर्वांचे लक्ष अजित पवार यांच्या काटेवाडी या ग्राम पंचायतीकडे लागले होते. या ठिकाणी अजित पवार यांच्यासमोर भाजपचे आव्हान होते. काटेवाडी ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्षे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता राहिलेली नाही.
आंबेगावात दिलीप वळसे यांना धक्का
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गावात धक्कायक निकाल आला आहे. या ठिकाणी चुरशीच्या झालेल्या लढतीत शिंदे गटाचे रवी वळसे 135 मतांनी विजयी झाले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीसाठी हा निकाल धक्कादायक राहिला आहे. एकीकडे पुणे जिल्हयात अजित पवार गटाचे वर्चस्व मिळत असताना आंबेगाव येथे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.
भाजपचा ईश्वरचिठ्ठीने विजयी
बारामती तालुक्यात भाजपचा पहिला सरपंच विजयी झाला आहे. गावातील एका जागेसाठी दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली. त्यानंतर ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात भाजपचा उमेदवार विजयी झाला. बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी येथे भाजपचा विजय झाला.
25 पैकी 24 ग्रामपंचायतीत अजित पवारच दादा
1)भोंडवेवाडी 2)म्हसोबा नगर 3)पवई माळ 4)आंबी बुद्रुक 5)पानसरे वाडी 6)गाडीखेल 7)जराडवाडी 8)करंजे 9)कुतवळवाडी 10)दंडवाडी 11)मगरवाडी 12)निंबोडी 13)साबळेवाडी 14)उंडवडी कप 15)काळखैरेवाडी 16)चौधरवाडी 17)वंजारवाडी 18)करंजे पूल 19)धुमाळवाडी 20)कऱ्हावागज 21)सायबाचीवाडी 22)कोराळे खुर्द 23) शिर्सुफळ 24) मेडद 25) चांदगुडेवाडी – सरपंच भाजप