Pune : आजीला झोप लागली अन् खेळता खेळता मुलगी विहिरीत पडली; पुण्यातल्या निरगुडसरमधली दुर्दैवी घटना

मुलीचे वडील संतोष दगडे यांनी शनिवारी दिवसभर मुलीचा शोध घेतला. परंतु मुलगी सापडली नाही. त्यांनी याबाबत मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. रविवारी सकाळी मेंढपाळ आणि ग्रामस्थांनी विहिरीमध्ये शोध घेतला असता मुलीची ओढणी पाण्यात तरंगताना आढळून आली.

Pune : आजीला झोप लागली अन् खेळता खेळता मुलगी विहिरीत पडली; पुण्यातल्या निरगुडसरमधली दुर्दैवी घटना
याच विहिरीत पाय घसरून पडली चिमुकलीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 10:22 AM

निरगुडसर, आंबेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील विहिरीत पाय घसरून पडल्याने (Fall in well) बुडून सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. मेंढपाळाचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची ही सहावर्षीय लहान मुलगी खेळताना पाय घसरून 50 फूट खोल विहिरीच्या पाण्यात पडली. तब्बल 28 तासांनी या मुलीचा मृतदेह (Deadbody) जुन्नर येथील आपत्कालीन व्यवस्थापन टीमने विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढला. जिजाबाई संतोष दगडे असे विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या लहान मुलीचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निरगुडसर (Nirgudsar) येथील बाम्हणदरा येथील जारकरवाडी ते मेंगडेवाडी मंचर रस्त्याच्या बाजूला ओढ्याच्याकडे शेतकरी सुरेश किरवे यांच्या मालकीची विहीर असून मेढपाळ संतोष लालु दगडे (मूळगाव पारनेर तालुक्यातील वडगाव सावतळ) मेंढपाळ यांची मेंढरे ओढ्यावरील पाणी पिण्यासाठी आली.

आजीला झोप लागली

पाणी प्यायल्यानंतर मेंढ्या झाडाच्या सावलीत बसल्या होत्या. मुलीचे वडील गावात गेले होते. झाडाखाली मुलीची आजी सुमनबाई लालू दगडे, मुलगी जिजाबाई दगडे या दोघीच होत्या. मुलीच्या आजीला झोप लागली असल्याने मुलगी झाडाखाली खेळत असताना शेजारील विहिरीत मुलीचा तोल जावून ही मुलगी 50 फूट विहिरीमध्ये पडून पाण्यात बुडाली. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती.

मंचर पोलिसांत फिर्याद

मुलीचे वडील संतोष दगडे यांनी शनिवारी दिवसभर मुलीचा शोध घेतला. परंतु मुलगी सापडली नाही. त्यांनी याबाबत मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. रविवारी सकाळी मेंढपाळ आणि ग्रामस्थांनी विहिरीमध्ये शोध घेतला असता मुलीची ओढणी पाण्यात तरंगताना आढळून आली. विहिरीतून मुलीला बाहेर काढण्यासाठी समीर मेंगडे आणि निरगुडसरचे सरपंच आनंदराव वळसे यांनी जुन्नर येथील आपत्ती व्यवस्थापन टीमला कळविले.

हे सुद्धा वाचा

पाणी उपसा केला

सकाळी मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सकाळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिश होडगर आणि जमादार टी. एस. मोरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मुलीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. परंतु यश आले नाही. त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन टीमने मुलीला बाहेर काढण्यासाठी विहिरीतील पाण्यात जावून प्रयत्न केला. परंतु विहिरीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामस्थांनी पाणी उपसा करण्यासाठी तीन विद्युत (मोटारी) पंप आणून पाणी उपसण्यासाठी सुरुवात केली. रात्री सात वाजण्याच्या सुमारास विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलीचा मूतदेह बाहेर काढण्यात आला.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.