चीनमध्ये न्यूमोनियाचा उद्रेक, महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा, आरोग्य विभागाची “अ‍ॅडव्हाझरी”

China Virus Pneumonia | चीनमधील न्यूमोनिआच्या पार्श्वभूमीवर राज्यात मार्गदर्शक सूचना दिल्या आहे. त्यानुसार प्रत्येक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात सारीच सर्वेक्षण करा, श्वसनसंस्थेचे येणारे अहवाल गांभीर्याने घ्या, मनुष्यबळ प्रशिक्षण देवून तयार कराव,ऑक्सीजन प्लांट, खाटाची व्यवस्था करण्यात यावी.

चीनमध्ये न्यूमोनियाचा उद्रेक, महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा, आरोग्य विभागाची अ‍ॅडव्हाझरी
china pneumonia
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 7:59 AM

प्रदीप कापसे, पुणे, दि. 30 नोव्हेंबर 2023 | चीनमधून आलेल्या कोरोनामुळे दोन वर्षांपेक्षा अधिक काळ जगातील आरोग्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था धोक्यात आली होती. कोरोनाचा प्रसार चीनमधून जगभर झाला होता. आता पुन्हा चीनमध्ये न्यूमोनिआचा उद्रेक झाला आहे. या न्यूमोनिआमुळे रोज हजारो मुले रुग्णालयात दाखल होत आहे. चीनमधील या प्रकारानंतर भारताही पावले उचलली गेली आहे. केंद्र सरकारकडून सगळ्या राज्याच्या आरोग्य विभागला सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या हिवताप विभागाचे सहसंचालक प्रताप सरणीकर यांच्याकडून राज्यातील सगळ्या जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला सूचना जारी केल्या आहेत. सध्या तरी भारतात याचा धोका नसला तरी सगळी आरोग्य व्यवस्था अलर्टवर आहे.

काय आहे “अ‍ॅडव्हाझरी”

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेकानंतर आता न्यूमोनिआचा प्रसार वेगाने होत आहे. संसर्ग इन्फ्लुएझा, मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया, कोव्हिडमुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात केंद्रसरकारकडून आलेल्या सूचनानंतर महाराष्ट्रात “अ‍ॅडव्हाझरी” जारी करण्यात आली आहे. प्रत्येक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात सारीच सर्वेक्षण करा, श्वसनसंस्थेचे येणारे अहवाल गांभीर्याने घ्या, मनुष्यबळ प्रशिक्षण देवून तयार कराव,ऑक्सीजन प्लांट, खाटाची व्यवस्था करण्यात यावी, उद्रेक परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज करावी, असे आदेश आरोग्य विभागाने सर्व महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य विभागातील केंद्रांना दिले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहेत न्यूमोनिआची लक्षणे

  • श्वास घेण्यासाठी त्रास होतो, दम लागतो आणि ठसका लागतो.
  • ताप येणे, थंडी वाजते व खूप घामही येतो.
  • ह्रदयाच्या ठोक्यांचे प्रमाण वाढते.
  • कफ, छातीत दुखणे, उलट्या होणे किंवा डायरिया ही लक्षणे दिसू लागतात.

काय दिल्या सूचना

ज्यांचे वय ६० वर्षांच्या पुढे आहेत, त्यांनी आणि लहान मुलांनी फ्लूचे लसीकरण दरवर्षी करुन घ्यावे, अशी सूचना फुफ्फुस तथा श्वसनविकार तज्ज्ञ डॉक्टर हिमांशू पोफळे यांनी केली आहे. चीनमधील उद्रेकाची भीती आपणास नाही. परंतु आरोग्य व्यवस्था मजबून ठेवण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करण्याची गरज आहे, असे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे महासंचालक डॉक्टर अतुल गोयल यांनी म्हटले आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.