धक्कादायक, समोस्यांमध्ये गुटख्यासह कंडोम आणि दगड कोंबले, पोलिसांनी छडा लावतच हे सत्य आले बाहेर

Pune Crime : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समोस्यांमध्ये गुटखा, तंबाखू, कंडोम आणि दगड कोंबून ते कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. कँटिनमध्ये कर्मचाऱ्यांना हे समोसे देण्यात आले होते.

धक्कादायक, समोस्यांमध्ये गुटख्यासह कंडोम आणि दगड कोंबले, पोलिसांनी छडा लावतच हे सत्य आले बाहेर
समोस्यात कंडोम, दगड
Follow us
| Updated on: Apr 09, 2024 | 10:23 AM

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑटोमोबाईलच्या कँटिनमध्ये कर्मचाऱ्यांना निरोध, तंबाखू, गुटखा, दगड कोंबलेले समोसे देण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ANI ने याविषयीचे वृत्त दिले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. कंपनीने एका कंत्राटदारांचं कंत्राट रद्द केले होते. त्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. व्यवसाय आणि कंपनीवरचा राग यातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमोबाईल फर्मच्या कँटीनमध्ये खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्यात येतो. या फर्मने दुसऱ्या एका कंत्राटदाराला कँटिनला समोसा पुरविण्याचे कंत्राट दिले होते. शनिवारी ऑटो फर्मच्या काही कर्मचाऱ्यांनी खाद्यपदार्थांविषयी तक्रार केली. समोस्यामध्ये निरोध, गुटखा आणि दगड मिळाल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणात दोघांवर संशय व्यक्त केला. त्यांनीच समोस्यात कंडोम, गुटखा आणि दगड भरल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

27 मार्च रोजी हा प्रकार घडला होता. कँटिनमध्ये कर्मचारी समोसा खात असताना त्यामध्ये निरोध, गुटखा, पान मसाला, दगड आढळले होते. कंत्राट रद्द केल्याच्या रागातून हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. समस्योत काही तरी मिसळून ठेकेदाराला बदनाम करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. पोलिसांनी प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. प्रकरणात पोलिस पुढील तपास करत आहेत.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.