पुणे : कोरोनाच्या धक्क्यातून अजून कुठे जग सावरतेय. अन् गेल्या दोन महिन्यांपासून एक नवीन व्हायरसचे संकट आले आहे. पुण्यात या व्हायरसचा धोका वाढला आहे. ‘इन्फ्लुएन्झा ए’ या विषाणूचा उपप्रकारामुळे ICU फुल झाले आहेत. या विषाणूमुळे खोकला आणि तापचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात H3N2 आजार मुलांमध्ये वाढला आहे. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये हा आजार वाढत असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर अनेक मुले रुग्णालयात दाखल होत आहे. या आजारासाठी एंटीबायोटिक औषधींचा फारसा उपयोग होत नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) या आजारासंदर्भात आकडेवारी जाहीर केली आहे.
ICMR च्या आकडेवारीनुसार पुणे शहरात 2,529 नमुण्यांची तपासणी केली गेली. त्यात 428 (17 टक्के) नमुने पॉझिटिव्ह सापडले आहे. दुसरीकडे, फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात इन्फ्लुएंझा ए व्हायरसमध्ये H3N2 संसर्गाची सर्वाधिक नोंद झाली आहे. एनआयव्हीच्या शास्त्रज्ञ डॉ वर्षा पोतदार यांनी सांगितले की, हे नमुने पुणे जिल्ह्यातील गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम (SARI) च्या लक्षणांसह रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे आहेत.
काय म्हणतात डॉक्टर
भारती हॉस्पिटलच्या बालरोग ICU च्या प्रभारी डॉ. भक्ती सारंगी म्हणाल्या, “आमचे ICU गेल्या 4-6 आठवड्यांपासून पूर्ण भरले आहेत. लहान मुले आणि शाळकरी मुले यांच्यात H3N2 चा सर्वाधिक परिणाम होत आहे. त्यापैकी काहींना यकृत आणि रक्तदाबाशी संबंधित समस्याही होत्या. यामुळे अशा रुग्णांना व्हेंटिलेटरचा आधार द्यावा लागत आहे. यातील बहुतांश पाच वर्षांखालील मुले आहेत. सहसा लहान मुले श्वास घेण्यास त्रास, खोकला आणि तापाची तक्रार करतात. H3N2 व्यतिरिक्त, न्यूमोनिया सारखी लक्षणे देखील कायमस्वरूपी दिसत आहेत.
काय आहेत लक्षणे
ICMR च्या नुसार, सुमारे 92% तापाने, 86% खोकल्यासह, 27% श्वासोच्छवासासह, 16% अस्वस्थतेसह मुले दाखल होत आहेत. तसेच 16 टक्के रुग्णांमध्ये निमोनियाची लक्षणेही आहेत. दाखल होणाऱ्या सुमारे 10 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे.
काय आहे नेमका हा प्रकार?
काय काळजी घ्यावी