सांगलीने राज्याचे टेन्शन वाढवले, H3N2 चे रुग्ण सापडले

सांगली जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरु केला आहे. रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

सांगलीने राज्याचे टेन्शन वाढवले, H3N2 चे रुग्ण सापडले
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 11:48 AM

सांगली : महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी सांगलीतून आली आहे. महाराष्ट्रात आता H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन दिवासांत राज्यात H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक नगरमधील तर दुसरा पिंपरी- चिंचवडमधील आहे. या प्रकारामुळे राज्याचे टेन्शन वाढले असताना सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनानंतर ‘एच3,एन2’ चा विळखा पडला आहे. जिल्ह्यातही पाच रुग्ण आढळून आले आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात तीन आणि ग्रामीण भागात दोन रुग्णांचा समावेश आहे

कुठे किती रुग्ण

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ‘एच 3 एन 2’ या स्वाईन फल्यूच्या उपप्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. सांगली जिल्ह्यात पाच रुग्ण आढळून आले. यातील तीन रुग्ण सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील तर दोन ग्रामीण भागातील आहेत. सांगली जिल्ह्यामधील या प्रकारानंतरत आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

स्वतंत्र कक्ष सुरु

प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात पाच रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले, अशी माहिती आरोग्य विभागान दिली.

आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून जिल्हयातील 64 प्राथमिक आरोग्य केंद्र व 320 उपकेंद्राच्या ठिकाणी ताप, सर्दी व खोकला अशी लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांच्या तपासणी व उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. या कक्षामध्ये रुग्णांच्या आरोग्य तपासणीसह एच 3 एन 2 आजाराच्या निदानासाठी आर.टी.पी.सी.आर स्वॅब घेवून शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाकडे पाठविले जातात. तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या ठिकाणी या आजाराच्या उपचाराकरीता पुरेसा औषधसाठा ठेवला आहे.

राज्यात संख्या वाढली

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक रुग्ण असून छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये रुग्ण आढळून येत आहे. राज्यात नगरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवडमध्येही एकाचा मृत्यू झाला.

आरोग्य विभाग अलर्ट

H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा मृत्यू झाल्याने आता आरोग्य विभाग अलर्ट होत असतांना नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. सर्दी ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचे आहे. दुर्लक्ष न करता तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.