शरद पवार, वडेट्टीवार यांच्यात बंद दाराआड राजकीय चर्चा, वडेट्टीवार यांनीच फोडली बातमी

| Updated on: Nov 18, 2023 | 2:08 PM

sharad pawar and vijay Wadettiwar : राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय घडोमोडी सुरु आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारले आहे. एकूणच राज्यात राजकीय परिस्थिती बदलली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

शरद पवार, वडेट्टीवार यांच्यात बंद दाराआड राजकीय चर्चा, वडेट्टीवार यांनीच फोडली बातमी
sharad pawar and vijay Wadettiwar
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

नवीद पठाण, बारामती, पुणे | 18 नोव्हेंबर 2023 : राज्यात विविध समाजाचे आरक्षणाचे आंदोलन सुरु आहे. मराठा आंदोलनास उत्तर देण्यासाठी ओबीसी नेते आक्रमक झाले आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती वर्षभरात मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोध पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धातास बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत काय झाले? हे विजय वडेट्टीवार यांनीच सांगितले.

आरक्षण आणि राजकीय विषयावर चर्चा

शरद पवार यांच्यासोबत आरक्षणासह राजकीय विषयांवर चर्चा झाली. शरद पवार यांना आम्ही सांगितले की, ओबीसीच्या वाट्यातले आम्ही कोणी देणार नाही. परंतु मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. आगीत तेल ओतण्याचे काम जे कोणी करत असतील त्यांनी ते बंद करावे. समाजा समाजात भांडणे लावली जात आहे. हे करणारे सत्ताधारी आहेत. कोणी मराठा समाजाच्या मागे उभा राहतो तर कोणी ओबीसी समाजाच्या मागे उभा राहत आहे. सत्ताधारी पक्षाचे मंत्री छगन भुजबळ ओबीसीची भूमिका मांडतात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे यांच्या पाठीशी आहेत, हे सगळे प्रश्न कोणी निर्माण केले आहे हे मी लवकरच उघड करेल.

काय झाली राजकीय चर्चा

पवार साहेब यांच्यासोबत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. परंतु ही चर्चा मी माध्यमांपुढे उघड करणार नाही. सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत. तुम्ही सगळे सांगा, असे म्हणाले तर प्लॅनिंग ओपन होते. त्यामुळे आम्ही काय करणार आहोत, ते पुढच्या व्यक्तीला माहीत होईल.

हे सुद्धा वाचा

भुजबळ यांच्याविषयावर…

ओबीसी नेते छगन भुजबळ शुक्रवारी जालना येथील सभेत चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. भुजबळ यांच्यासंदर्भात विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी भुजबळ यांच्यासंदर्भात काहीच बोलणार नाही. आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यावर बोलताना सत्ताधारी लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.