पुणे | ‘प्रमोशनसाठी माझ्या बॉससोबत संबंध ठेव’, पत्नी १२ वर्षाच्या मुलीसाठी सहन करत होती, अखेर

| Updated on: Feb 24, 2023 | 9:48 AM

महिला न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने महिला व बालविकास विभागाला समन्स बजावले. प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

पुणे | प्रमोशनसाठी माझ्या बॉससोबत संबंध ठेव, पत्नी १२ वर्षाच्या मुलीसाठी सहन करत होती, अखेर
this crime is big related to wife
Image Credit source: Social Media
Follow us on

पुणे : लैंगिक छळाचा अनोखा प्रकार पुणे शहरातून (Pune Crime News) बाहेर आला आहे. नवऱ्याच्या प्रमोशनसाठी त्याच्या बाससोबत शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यासाठी विरोध केल्यावर बेदम मारहाण करण्यात आली. परंतु घर तुटू नये म्हणून मारहाण व अत्याचार सहन करत राहिले. आपल्या 12 वर्षांच्या मुलीसाठी हे सर्व आपण मूकपणे सहन केले, असे महिने केलेल्या तक्रारीत म्हटलंय. हा प्रकार सासऱ्यांना सांगितला. परंतु त्यांनीही ऐकले नाही. यामुळे शेवटी महिना न्यायालयात पोहचली. न्यायालयाने महिला व बालविकास आयोगाला चौकशीचे आदेश दिले.

महिला व बालविकास आयोगाच्या गोपनीय अहवालानंतर न्यायालयाने पती, सासू आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकार

नंदनगर येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेचा अमित छाबरा याच्याशी २००३ मध्ये विवाह झाला होता. अमित कपड्यांच्या शोरूममध्ये विक्रीचे काम करतो. दोघांना १२ वर्षांची मुलगी आहे. पतीचा पगार महिन्याला १० हजार रुपये आहे. त्याला पगारात वाढ हवी होती आणि म्हणून त्याला प्रमोशन हवे होते.

अमित पत्तीला माझ्या बॉसशी संबंध ठेवावे लागतील, असे वारंवार सांगत होता. महिलेने नकार दिल्यावर त्याने मारहाण सुरु केली. अनेकदा दबाब आणला.त्याने धमकीही दिली. पण महिलेने कधीच हो म्हटलं नाही. कुटुंबाला वाचवण्यासाठी महिला शांतपणे त्रास सहन करत होती.

दिरकडून अश्लील वर्तन


पतीचा हा प्रकार मी ऐकत नसल्यामुळे देवर राजनेही त्या महिलेसबोत अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली, असा कथित आरोप तक्रारीत केला आहे. हा प्रकार सासू हेमलता यांना सांगितल्यावर त्यांनीही पती आणि दिराला विरोध केला नाही. त्या दोघांना समजावण्याऐवजी सासूकडूनही मारहाण होत होती.

आत्महत्येचा प्रयत्न


सासरच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने हाताची नस कापली. मात्र उपचार होईपर्यंत सासरचे लोक गप्प राहिले. यानंतर त्याने पुन्हा अत्याचार करण्यास सुरुवात केली. पती, दिर आणि सासूच्या त्रासाला कंटाळून महिला १२ ऑगस्ट २०२२ रोजी पुणे येथून इंदूरला आली. काही दिवसांनी पती अमित हा देखील इंदूरला आला आणि सर्वांसमोर मारहाण केली. याबाबत पीडितेने पोलिसांत तक्रार केली.

महिला व बालविकास विभागाचा अहवाल


महिला न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने महिला व बालविकास विभागाला समन्स बजावले. प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर महिला व बालविकास विभागाच्या पथकाने पीडितेशी संवाद साधला. पीडितेची अनेक तास चौकशी केली. महिला व बालविकास विभागाच्या पथकाला तिच्यावरील लैंगिक अत्याचाराचे आरोप खरे असल्याचे आढळून आले.

त्यानंतर गोपनीय अहवाल न्यायालयात सादर केला. महिला व बालविकास विभागाचा अहवाल पाहिल्यानंतर न्यायालयाने पीडितेचा पती अमित छाबरा, मेहुणा राज, सासू हेमलता यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.