Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात 40 वर्षे झालीत, मला अडाणी समजू नका; हर्षवर्धन पाटील यांचा खणखणीत इशारा, विधानसभेपूर्वी मोठी अपडेट काय?

Harshvardhan Patil : इंदापूर मतदारसंघावरुन सध्या महायुतीत महाभारत सुरु आहे. अजित पवार यांनी अगोदरच या मतदार संघावर दावा सांगितला आहे. तर आता हर्षवर्धन पाटील पण आक्रमक झाले आहेत. राजकारणात 40 वर्षे झालीत, मला अडाणी समजू नका, असा खणखणीत इशाराच त्यांनी नेतृत्वाला दिला आहे.

राजकारणात 40 वर्षे झालीत, मला अडाणी समजू नका; हर्षवर्धन पाटील यांचा खणखणीत इशारा, विधानसभेपूर्वी मोठी अपडेट काय?
हर्षवर्धन पाटील आक्रमक
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 3:06 PM

विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीत जागा वाटपावरून महाभारत सुरु असल्याचे चित्र आहे. त्यात इंदापूर मतदारसंघावरून मोठा खल सुरु आहे. अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेतून मोठी ताकद दाखवली. इंदापूर गुलाबी झाले. आमदार दत्ता भारणे पण गुलाबी रंगात न्हाऊन निघाले. त्यामुळे दादांचा गट या मतदारसंघात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. तर हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेले हर्षवर्धन पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली. राजकारणात 40 वर्षे झालीत, मला अडाणी समजू नका, असा खणखणीत इशाराच त्यांनी नेतृत्वाला दिला आहे.

विधानसभेत होईल परिवर्तन

आपल्या सगळ्यांचा पाठबळ बघितल्यानंतर 2024 च्या विधानसभेत परिवर्तन होईल. महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती आहे मला माहित नाही. इंदापूर च्या विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा ही तालुक्यापूर्ती मर्यादित राहिली नाही. राजकीय वातावरणावर महाराष्ट्रात चर्चा आहे. इंदापूर तालुक्यात बदल होणार आहे, हे नागरिकांनी ठरवलं आहे, असे हर्षवर्धन पाटील

हे सुद्धा वाचा

याचा अर्थ काय घ्याचा तो घ्या

उद्याची निवडणूक लढवायची की नाही हा प्रश्न आहे. उद्याच्या आमदारकीच्या निकालापेक्षा दहा वर्षे काही नसताना सोबत राहिली, ते निष्ठावन्त सोबत आहेत. म्हणून आज वेगळी ताकद निर्माण झाली आहे. आज सगळ्यांचे फोन येत आहेत. याचा अर्थ काय घ्याचा तो घ्या. मी कुणाला होकार दिलेला नाही. जी चर्चा लोकसभेच्या वेळी झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी मैत्री आहे. त्यांना भेटणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अपमान सहन करणार नाही

राष्ट्रवादीची यात्रा आली ते जे बोलले हा महायुतीचा धर्म आहे का? जागा वाटप व्हायचं आहे. कुणाला कुठलं जागा मिळायची हे बाकी आहे. अजित पवारांना जाहीर प्रश्न विचारतो. तुम्ही इंदापूरमध्ये येऊन काय सांगितलं. देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मी मान्य करणार असं अजित पवार म्हणाले. तरीही, त्यांनी इंदापूरमध्ये येऊन जाहीर काय केलं. इंदापूर च्या जनतेला दुखावण्याचा अधिकार नाही. हर्षवर्धन पाटील सर्व गोष्टी सहन करेल अपमान सहन करणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

अपक्ष लढणार का?

अपक्ष लढायचं या लोकांच्या भावना आहेत. इंदापूर तालुका गेल्या दहा वर्षात विकासापासून 50 वर्ष दूर गेला आहे. काळ बदलला आहे, मतदार खूप हुशार झाला आहे. दोन- चार दिवसात विचार करू. कुणाला भेटायचं?, कुणाला विचारायचं? कुठलीही गोष्ट मी अंधारात करत नाही. इकडे एक आणि तिकडे एक ही गोष्ट करत नाही. एखादी लबाडी एखाद्या निवडणुकीला खपवून जाते. प्रत्येक वेळी नाही. पुढील निर्णय सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय घेणार नाही. विधानसभा निवडणुकीला अडीच ते तीन महिन्यांच्या काळ आहे. बोलून प्रश्न सुटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या आमदारकी डोक्यात ठेवा

दोन निवडणुकीला फार मोठा झटका बसला. 2014 ला घटना घडली नसती तर 2019 लढण्याचा प्रश्न च आला नसता. आपण कमी पडलो म्हणून आपण हरलो. आपला हलगर्जीपणा झाला. पुन्हा अशी चूक होऊ नये. अस घडू नये याची काळजी घेण्याची गरज आहे. कुणाबद्दल अपशब्द बोलू नका. वेडंवाकडं वागू नका. सध्या आमदारकी डोक्यात ठेवा. बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवू नका. मंत्री पदाच पुढं बघू, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

मला अडाणी समजू नका

माझ्या बाबतीत उमेदवारी तिकीट हा कायमच वादाचा मुद्दा राहिलेला आहे. जिथं, जिथं योग्य भूमिका घ्यायची गरज आहे, तिथं घेऊ. मला ही राजकारणात 40 वर्ष झाली आहेत. मलाही राज्यातली आराखडे कळतात. मला अडाणी समजू नका, असा टोला पण त्यांनी यावेळी हाणला. त्यांचा हा टोला कुणाला होता, हे वेगळं सांगायची गरज नाही. विस्कटलेली पुन्हा बसवायची आहे. पुढील काळात विस्कटलेली घडी दुरुस्त करायची आहे. थोडा वेळ लागेल, असे ते म्हणाले.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.