सोमय्या-राऊत वादावर बोलणार नाही, मी लहान कार्यकर्ता, मुश्रीफांचा कुणाला टोला?

या वादाबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना विचारले असता, त्यांनी मात्र सावध पवित्रा घेत टोलेबाजी केली आहे. यावर मी बोलणार नाही, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. असा टोला मुश्रीपांना लगावला आहे.

सोमय्या-राऊत वादावर बोलणार नाही, मी लहान कार्यकर्ता, मुश्रीफांचा कुणाला टोला?
मुश्रीफांचा टोला नेमका कुणाला?
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 7:29 PM

पुणे : राज्यात सध्या किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) विरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) या वादाचा एपिसोड सध्या चांगलाच गाजत आहे. या वादावर महाविकास आघाडी आणि भाजपकडून एकापाठोपाठ एक प्रतिक्रिया येत आहेत. हा कुठेतरी थांबला पाहिजे अशा प्रतिक्रियाही येत आहे. सुरूवातील सोमय्या यांनी संजय राऊतांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याला संजय राऊतांनी बहुचर्चित पत्रकार परिषद घेत जोरदार उत्तर दिले. त्यानंतर सोमय्यांनी कोर्लईपासून ते पुण्यापर्यंत सर्व पिंजून काढलं. या वादाबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना विचारले असता, त्यांनी मात्र सावध पवित्रा घेत टोलेबाजी केली आहे. यावर मी बोलणार नाही, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. असा टोला मुश्रीपांना लगावला आहे. मग हा टोला सोमय्यांना आहे? की संजय राऊतांना? हे मात्र कळायला मार्ग नाही. दोन्ही बाजुंनी जहरी वाक्यांचे बाण सुटत असताना मुश्रीफांचं हे अबोलपण आता चर्चेत आलंय.

वादात बड्या नेत्यांची उडी

राज्यात सत्ता न मिळाल्यामुळे भाजप सध्या अस्वस्थ असून त्यांनी या वादाला सुरुवात केली आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. हा वाद फक्त सोमय्या आणि राऊत यांच्यापुरताच मर्यादित नाही राहिला. तर चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, अशा बड्या नेत्यांनी या वादत उडी घेतली आहे. नारायणे राणे यांनी तर थेट दिशा सॅलियनच्या बलात्कारचा आणि हत्येचाच आरोप केल्याने खळबळ माजली आहे. दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, आमच्याकडेही काही माहिती आहे. 8 जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. सांगितले काय, तिनं आत्महत्या केली. तिला पार्टीला थांबायला सांगितलं. ती थांबली नाही. त्यानंतर कोण होतं. पोलीस प्रोटेक्शन कुणाला होतं. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर प्रोटेक्शन कुणाचं होतं. तिचा पोस्टमार्टेम अहवाल का आला नाही. त्या इमारतीत राहायची त्यातील 8 जूनची पानं कुणी फाडली. कुणाला इंटरेस्ट होता, असा सवाल राणे यांनी केला आहे.

लवकरच निर्बंध शिथिल होणार

तसेच करोना निर्बंधांवरही मुश्रीफांनी भाष्य केले आहे.कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे टप्प्या टप्प्याने शिथिलता देण्यात येईल, असे ते म्हणाले आहेत.येत्या दोन-तीन दिवसात टास्क फोर्सची बैठक आहे, यामध्ये शिथिलता देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे, अशी महत्वाची माहिती मुश्रीफांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे आपले सर्वांचेच दिवस कोणत्या ना कोणत्या निर्बंधात गेले आहेत.

Video | धनंजय मुंडेंचा स्क्वेअर कट पाहिलात का? सरपंच प्रीमिअर लीगमध्ये कुटल्या 7 चेंडूत 11 धावा

जेवढी मदत करायची होती तेवढी केली, अजित पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन

एखाद्याला मुलगा झाला तरी काही लोक श्रेय घेतात; फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांना टोला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.