रस्ते घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांविरोधात एफआयआर दाखल करणार; हसन मुश्रीफ यांनी शड्डू ठोकले

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या या आरोपांवर पलटवार केला आहे. (hasan mushrif to lodge fir against chandrakant patil)

रस्ते घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांविरोधात एफआयआर दाखल करणार; हसन मुश्रीफ यांनी शड्डू ठोकले
हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 2:54 PM

कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या या आरोपांवर पलटवार केला आहे. सोमय्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर आरोप केल्याचा दावा करतानाच रस्ते घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. (hasan mushrif to lodge fir against chandrakant patil)

किरीट सोमय्या यांनी आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवली होती. त्यानंतर लगेचच मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांच्या आरोपांमधील हवा काढून टाकली. मात्र, यावेळी त्यांनी थेट चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करणार असल्याचंही जाहीर केलं. माझ्याकडे बेनामी संपत्ती असल्याचा शोध सोमय्या यांनी कुठून लावला? चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काही तरी माहिती दिल्यानंतर सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत, असा दावा त्यांनी केला.

कायदेशीर सल्ला घेणार

चंद्रकांत पाटील यंच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आहे. राज्यातील 90 टक्के रस्ते बंद आहेत. कंत्राटदार पळून गेले आहेत. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कायदेशीर सल्ला घेऊन अँटी करप्शनमध्ये त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे, असं सांगतानाच समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.

कोल्हापूरला येऊन माहिती घ्यायला हवी होती

इन्कम टॅक्स विभागाने अडीच वर्षापूर्वी माझ्या कार्यालयावर धाड टाकली होती. त्यानंतर अडीच वर्ष झाले तरी काहीच कारवाई केली नाही. आता सोमय्या यांनी उठून बेनामी संपत्तीचा आरोप केला आहे. कुठून शोध लावला त्यांनी? सोमय्या या बिचाऱ्याला काहीच माहीत नाही. त्यांनी आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काहीतरी माहिती दिल्यावर हे आरोप केले. खरं तर त्यांनी कागल आणि कोल्हापूरला येऊन माहिती घ्यायला हवी होती. ते आले असते तर त्यांना माहिती मिळाली असती, असा चिमटा त्यांनी काढला.

लोकांनी पैसा दिला अन् कारखाना उभा राहिला

जवळ जवळ हजारो शेतकऱ्यांनी कारखान्यात पैसा गुंतवला होता. क्रांती दिनाच्या दिवशी आम्ही शेअर्स काढले. आपला कारखाना पाहिजे म्हणून आम्ही कारखाना काढला होता. त्यावेळी सरकारने सहकारी कारखानदारी बंद केली होती, रजिस्ट्रेशन बंद केलं होतं. भाग भांडवल बंद केलं होतं. म्हणून आम्ही हा प्रायव्हेट कारखाना काढला. ज्या दिवशी लायसन्स मिळवलं आणि आवाहन केलं तेव्हा 17 कोटी रुपये एका दिवशी जमा झाले. एचडीएफसी, अॅक्सिस बँक आणि महाराष्ट्र देना बँक यांची नोट काऊंट करणारी मशीन घेऊन लोक चार दिवस पैसे मोजत होते. हजारो लोकांनी पैसा दिला. त्याचा कोल्हापूरच्या इन्कम टॅक्सने तपास केला. लोकांना नोटिसही पाठवली होती. त्यांचीही चौकशी केली होती. त्यातून हा कारखाना उभा राहिला. या कारखान्याची कर्जफेडही झाली. हा नववा हंगाम आहे. सोमय्याला त्याची काहीच माहीत नाही. कुणी तरी त्यांना सांगितलं म्हणून ते बोलत आहेत, असं ते म्हणाले.

सातवा दावा करणार

सोमय्या हे माझी प्रतिमा डागळण्यासाठीच बोलत आहेत. माझ्यावर जेव्हा जेव्हा असे आरोप केले तेव्हा तेव्हा आरोप करणाऱ्यांवर मी 50 कोटींचे दावे केले आहेत. आता सातवा दावा करणार आहे. 100 कोटींचा दावा करणार आहे. मी 17 वर्ष मंत्री आहे. माझ्यावर कधीच कोणता आरोप झाला नाही. उलट तुमच्या काळात अनेक घोटाळे झाले, असं ते म्हणाले.

कोल्हापुरात भाजप सपाट

सोमय्या जेव्हा तारखेला येतील तेव्हा त्यांनी कोल्हापुरात आल्यावर माहिती घ्यावी. भाजप कोल्हापुरात सपाट झाला आहे हे त्यांच्या लक्षात येईल. भाजपला कुठंही स्थान नाही. म्हणून चंद्रकांत पाटलांना पुण्यात जावं लागलं. पुढील दहा वर्षे भाजपला कोल्हापुरात स्थान राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला. (hasan mushrif to lodge fir against chandrakant patil)

संबंधित बातम्या:

सोमय्यांनी मुश्रीफांविरोधात बत्ती लावली, उद्या ईडीकडे तक्रार नोंदवणार तर परवा केंद्रात तीन ठिकाणी पुरावे देणार

किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार : हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ कुटुंबांकडून 127 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांकडून कथित ‘डर्टी 11’मध्ये राखीव खेळाडूचं नाव!

(hasan mushrif to lodge fir against chandrakant patil)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.