‘एवढा मुर्खपणा कोणीही केला नसेल तसा मूर्खपणा त्यांनी केलेला आहे’, बच्चू कडू का म्हणाले असे
ईडीची कारवाई ही भाजप ची कारवाई ही भारतीय जनता पक्षाची कारवाई आहे. त्यामुळे ती शासकीय कारवाई नाही. महाविकास आघाडी सरकार कोसळणार या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले 'मी भविष्यावर जात विश्वास ठेवत नाही, मी वर्तमानावावर विश्वास ठेवतो.
पिंपरी – राज्यपाल हे खूप मोठं पद आहे. त्या पदाचा गरिमा राखणे महत्वाचा आहे. हा विचार त्यांच्या शब्दातला आणि बोलण्यातला त्यांच्या ओळी पुस्तक तयार होतं. या प्रकारे राज्यपालांनी (Governor) तुलनात्मक बोलण अतिशय निंदनीय आहे. हे अतिशय निंदनीय आहे. ‘मला वाटतं एवढा मूर्खपणा कोणीही केला नसेल तसा मूर्खपणा त्यांनी केलेला आहे.’ त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्यपालांचा वाचन विचित्र पुस्तकाकडे गेल, असेल कदाचित. पण आपण काय वाचतो आणि आपण काय बोलावं याचं भान ठेवलं पाहिजे असे म्हणत , राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार बच्चू कडू यांनी घेतला आहे.
ईडी हा भाजपचाच एक भाग
नवाब मलिक यांनी राजीनामा द्याचा काही विषयच नाही. ईडी हा शासकीय विषय नसून तो भाजपच्या कार्यालयातला एक भाग आहे. ईडीची कारवाई ही भाजप ची कारवाई ही भारतीय जनता पक्षाची कारवाई आहे. त्यामुळे ती शासकीय कारवाई नाही. महाविकास आघाडी सरकार कोसळणार या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले ‘मी भविष्यावर जात विश्वास ठेवत नाही, मी वर्तमानावावर विश्वास ठेवतो.
श्रेय घेण्याचा विषय नाही
रशियामध्ये अडकलेल्या भारतीयांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारला रशियात अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थी , नागरिकांचे फोन आले. अकोले मधून मलाही अनेक फोन आले. याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे माहिती पाठवली आहे. हे तर आमचे कर्तव्य आहे. असेही ते म्हणाले आहेत. त्यात श्रेय घेण्याचा काय संबध काय आहे. ‘ माणसाला पाणी पाजलं आणि पाणी पाजलं पाणी पाजलं अस जर तो बोंबलत असले तर ते उचित नाही. श्रेय कुठं घ्याच आणि कुठं नाही ह्याच भान असणे महत्वाचं आहे.
Miss Ukraine Anastasiia lenna : मिस युक्रेनच्या हाती बंदूक, अनास्तासिया लेना सैन्यात भरती?
Video – युक्रेनमध्ये अडकलेले विदर्भातील 2 विद्यार्थी नागपुरात परतले, विमानतळावर जल्लोषात स्वागत
वसंतदादा म्हणजे अल्पशिक्षित माणसातील अत्युच्च पातळीवरचं शहाणपण…