Pune Rain Alert: पुण्यात पावसाचा पुन्हा हाहा:कार, लोकांच्या घरांमध्ये पाणी, नादीपात्रात तिघांचा मृत्यू

pune dam water level: नदीपात्रात स्टॉल्स काढण्यासाठी गेलेल्या तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेजण एका अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. पुणे महानगर पालिकेच्या समोर असलेल्या टिळक पूल पाण्याखाली गेला आहे.

Pune Rain Alert: पुण्यात पावसाचा पुन्हा हाहा:कार, लोकांच्या घरांमध्ये पाणी, नादीपात्रात तिघांचा मृत्यू
पुण्यातील सिंहगड परिसरात असे दृश्य झाले होते.
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 1:31 PM

पुणे शहरात हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टचा परिणाम दिसून आला. बुधवार रात्रपासून शहरात पाण्याचे तांडव सुरु आहे. पावसाच्या या हाहा:कारामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील सिंहगड रोडसह नदीकाठच्या भागांमध्ये लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. पुणे शहराप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम असून अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. पिंपरी चिंचवडमधील लाल टोपी नगरमध्ये पहाटेपासूनच नागरिकांच्या घरात पाणी शिरलेले असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. त्यांनी प्रशासनला सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. हवामान विभागाने मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सांगली, हिंगोली, परभणी, लातूरसह कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात येत्या तीन ते चार तासांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

८ बोटी आणि बचाव पथके

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मावळमधील कुंडदेवी मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. मावळ तालुक्यात काल पासून तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पुणे महानगरपालिकेने ८ बोटी आणि बचाव पथके मदातकार्यासाठी नियुक्त केल्या आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्य पदार्थ व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यात पावासाची पुन्हा अंदाज

पुण्यात तिघांचा मृत्यू

नदीपात्रात स्टॉल्स काढण्यासाठी गेलेल्या तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेजण एका अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. पुणे महानगर पालिकेच्या समोर असलेल्या टिळक पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. ज्या भागात पाणी झाले त्या ठिकाणी बोटीही बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले आहे. पुणे शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. पार्किंगमध्ये गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथे असणारी इंद्रायणी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमळा येथे पाणी साकव पुलापर्यंत आले आहे. कुंडमळा परिसरात असणाऱ्या कुंडदेवी मातेचे मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. कुंडमळा परीसरात वर्षाविहार करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. मात्र कुंडमळा येथे पाण्याने रौद्ररूप धारण केल्याने पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.