पुण्यात हेल्मेटसक्ती, दुचाकीस्वारच नव्हे तर सहप्रवाशांना लागणार हेल्मेट

राज्यात दुचाकीस्वाराचे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. पुणे शहरात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर दरम्यान २७१ अपघात झाले. त्यात २७८ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकी चालकावर कारवाई होत नसल्याचे दिसून आले.

पुण्यात हेल्मेटसक्ती, दुचाकीस्वारच नव्हे तर सहप्रवाशांना लागणार हेल्मेट
helmet
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 9:28 AM

राज्यभरात दुचाकीस्वारांचे अपघात वाढत आहे. त्यामुळे राज्यात हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरुवात पुणे शहरातून होणार आहे. पुणे शहरात दुचाकीस्वारच नाही तर सहप्रवाशांवरही आता हेल्मेट लागणार आहे. विनाहेल्मेट असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी याबाबतचा आदेश पोलीस आयुक्तांना दिला असल्याने चालकाबरोबरच आता दुचाकीवरील सहप्रवाशालाही हेल्मेट परिधान करावे लागणार आहे.

आदेशाची अंमलबजावणी कधीपासून?

राज्यात यापूर्वी अनेक वेळा हेल्मट सक्ती करण्याचा निर्णय झाला. परंतु त्या निर्णयास जनतेकडून विरोध झाला. आता दुचाकीस्वारांचे वाढत्या अपघातांमुळे पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. सध्या वाहतूक पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करत आहे. परंतु आता रस्त्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. अपघाताचे प्रमाण वाढल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. परंतु या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होणार हे अद्याप स्पष्ट केले नाही.

का काढले हेल्मेट सक्तीचे आदेश

राज्यात दुचाकीस्वाराचे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. पुणे शहरात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर दरम्यान २७१ अपघात झाले. त्यात २७८ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकी चालकावर कारवाई होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले आहे.

हे सुद्धा वाचा

रेल्वे मार्गात 200 जणांचा मृत्यू

ठाणे ते कल्याण रेल्वे मार्गात 11 महिन्यांत 200 प्रवासी ठरले गर्दीचे बळी ठरले आहे. यामधील बहुतांशी प्रवासी हे कल्याण बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली राहणारे होते. आतापर्यंत 51 जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक अपघात हे 275 जणांचे केवळ रेल्वे मार्ग ओलांडताना झाले आहेत. तसेच 123 प्रवाशांचा विविध स्थानकात नैसर्गिक मृत्यू झाला आहे. काहींचा फलाट आणि गाडीच्या गॅपमध्ये सापडून मृत्यू झाला आहे.

'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला.
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?.
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.