ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना अटक केली तर कोणत्या नेत्याचे नाव बाहेर येईल?

ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकरे यांच्यावर कालच कारवाई झाली. ससून संबंधित चौकशी अहवाल आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही कारवाई झाली. ही कारवाई राज्य सरकारने केली नाही तर न्यायालयामुळे झाली आहे, असे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना अटक केली तर कोणत्या नेत्याचे नाव बाहेर येईल?
Lalit Patil
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 1:25 PM

गिरीश गायकवाड, मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर आणि अस्थिव्यंगोपचार पथक प्रमुख डॉ. देवकाते यांच्यावर शुक्रवारी कारवाई झाली. या दोघांचे निलंबन करण्यात आले. परंतु डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावरील कारवाई राज्य सरकारने केली नाही, ती न्यायालयाने केली. त्यात राज्य सरकारचे कोणतेही कर्तृत्व नाही. डॉक्टर संजीव ठाकूर यांना अटक केली तर अनेक गोष्टी बाहेर येतील, असा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? असा प्रश्न त्यांनी केला.

का झाली ठाकूर यांच्यावर कारवाई

सुषमा अंधारे यांनी सांगितले की, ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर आणि डॉक्टर विनायक काळे यांच्यात वाद आधीच सुरु होता. या प्रकरणात मॅटने डॉक्टर विनायक काळे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर ठाकूर यांनी उच्च न्यायालयामध्ये अपील केले होते. शुक्रवारी उच्च न्यायालयाने डॉक्टर संजीव ठाकूर यांची नियुक्ती चुकीची ठरवली आणि पद मुक्त केले. नेमकं कालच ससून संबंधित चौकशी अहवाल आला आणि त्या चौकशी अहवालामध्ये डॉक्टर ठाकूर यांना दोषी ठरवले. यामुळे ही कारवाई राज्य सरकारने केली नाही तर न्यायालयामुळे झाली. डॉक्टर ठाकूर यांची पदमुक्ती ही सरकारने केली नाही तर ती न्यायालयीन निकालामुळे झालेली आहे. यात सरकारचे कसलेही कर्तृत्व नाही.

डॉक्टर ठाकूर यांच्यावर राजकीय मेहरबानी

राजकीय मेहरबानीमुळे ससूनच्या डीन पदावर संजय ठाकूर यांना बसवण्यात आले. जर तुमचा चौकशी अहवालात ठाकूर दोषी असल्याचे मान्य केले तर मग ठाकूर याला अजून अटक का केली नाही. सरकारची आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाचा छडा लावायचा असेल तर दोषी आढळलेल्या ठाकूर याच्यावर तातडीने आरोपपत्र दाखल करून त्याला अटक व्हायला हवी. फक्त पदमुक्तच्या नावाखाली संजय ठाकूर याला एका अर्थाने डिग्नीफाइड एक्झिट देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

संजीव ठाकूर याने नाव घेतले तर…

संजीव ठाकूर याच्यावर सरकार का मेहरबान होत आहे ? संजीव ठाकूर याला वाचवण्यामध्ये कुणाचे हित आहे? संजीव ठाकूरला ताब्यात घेतले आणि त्याने तोंड उघडले तर कुणाचे नाव बाहेर येईल, अशी भीती वाटत आहे? ललित पाटील याला संरक्षण कोणी दिले? असा मुजोर सवाल करणारे गृहमंत्री आता त्याचे उत्तर देतील का? असा टोला संजीव ठाकूर यांनी सुषमा अंधारे यांना लगावला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.