कर्नाटकातील हिजाब बंदी प्रकरण : पुण्यातील IISER मध्ये हिजाब बंदीचा केला निषेध

कर्नाटकातील एका महाविद्यालयाने हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या सहा विद्यार्थिनींना प्रवेशबंदी केली होती. मात्र हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेतली आहे. त्या प्रकरणावरुन सध्या कर्नाटकात वादंग निर्माण झाला आहे.

कर्नाटकातील हिजाब बंदी प्रकरण : पुण्यातील IISER मध्ये हिजाब बंदीचा केला निषेध
Faculty and students of IISER
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 12:05 PM

पुणे – कर्नाटकमध्ये हिजाबवरून सुर झालेल्या वादाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. हिजाब बंदीवरून  मुस्लीम समुदायातील मुलींना या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केले होते. त्या मुलींना विविध स्तरांतून पाठिंबा व्यक्त केला जातोय. काल राष्ट्रवादी काँग्रेसने गंजपेठेतील भिडेवाडा येथे आंदोलन केलं या आंदोलनात (Protest) मोठ्याप्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आता पुण्यातील(Pune)राष्ट्रीय संस्था असलेल्या आयसरमधील (IISER) विद्यार्थी आणि प्राध्यपकांनी कर्नाटकच्या उडपीमधील मुस्लीम समुदायातील त्या मुलींना पाठिंबा दर्शविला आहे. संस्थेतील विद्यार्थी व शिक्षकांनी संस्थेच्या प्रिमायसेसमध्ये  एकत्र येत आपला निषेध नोंदवला.

हिजाब बंदीचा केला निषेध

गंज पेठेत आंदोलक महिलांनी नोंदवला निषेध गंज पेठेतील फुले वाड्यात हे आंदोलन करण्यात आलं. मुस्लिम महिलांसह इतरही महिला पारंपरिक वेशभूषेत महिला आंदोलक सहभागी झाल्या होत्या. कर्नाटकमधील काही कॉलेज कॅम्पसमध्ये हिजाबवर बंदी घालण्याची मागणी याचिका उच्च न्यायालयात नोंदवली गेली होती. ‘कर्नाटकात मुस्लीम मुलींसोबत झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. देशात भाजप आणि आरएसएस सध्या महिलांचे जीवन असुरक्षित करत आहेत’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. कर्नाटकमध्ये हिजाबवरून सुरू असलेला वादाचे देशभर गाजत आहे.

नेमकं प्रकरण काय? कर्नाटकातील एका महाविद्यालयाने हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या सहा विद्यार्थिनींना प्रवेशबंदी केली होती. मात्र हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेतली आहे. त्या प्रकरणावरुन सध्या कर्नाटकात वादंग निर्माण झाला आहे. हिजाब घालणाऱ्या युवतींचा विरोध म्हणून काही संघटना भगवी शाल अंगावर घालून कॉलेजमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. याबरोबर हिजाब घालून महाविद्यालयात आलेल्या तरुणीला अडवण्याची प्रयत्नही करण्यात आला. यावेळी ‘जय श्रीराम च्या घोषणात देत , भगवे झेंडे हात घेऊन तरुणांच्या जमावाने गोंधळ घातला होता.

Fact Check : दहावी बारावीच्या परीक्षा रद्दच्या व्हिडीओची लिंक तुमच्या व्हॉटसअपवर आलीय, जाणून घ्या त्या मागील सत्य

VIDEO | अलविदा करण्याआधी शेवटचं शूट, सिद्धूसोबत डान्स, रमेश देव यांचे अखेरचे क्षण

नागपूर जिल्हा वार्षिक योजनेचा फक्त पन्नास टक्केच निधी खर्च, उर्वरित निधी महिनाभरात कसा होणार खर्च?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.