‘प्रदीप कुरुलकर यांच्या परिवाराला सुद्धा ताब्यात घ्या’, आनंद दवे यांचं मोठं वक्तव्य

प्रदीप कुरुलकर प्रकरणावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. प्रदीप कुरुलकर यांच्या कुटुंबियांची देखील चौकशी करा, तसेच या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्या कुटुंबियांचीदेखील संपत्ती जप्त करा, अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे.

'प्रदीप कुरुलकर यांच्या परिवाराला सुद्धा ताब्यात घ्या', आनंद दवे यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 8:38 PM

पुणे : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर प्रकरणावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “प्रदीप कुरुलकर यांच्या परिवाराला पण ताब्यात घ्या आणि चौकशी करा”, अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे. “प्रदीप कुरुलकरांच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी केवळ अनैतिक वर्तवणूकच केली असं नाही तर भ्रष्टाचार सुद्धा केला आहे. आपल्या घरातील कर्त्या नव्हे कार्ट्या पुरुषाकडे नेहमीपेक्षा जास्त पैसा येतो आहे. त्यांचे संपर्क संशयास्पद आहेत, याची घरच्यांना कल्पना असणारच आहे”, असा दावा आनंद दवे यांनी केला. “या प्रकरणी देशद्रोही स्लीपर सेल्सना सुद्धा गुन्ह्यातील सहभागी म्हणून कलमे लावून अटक करावी. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या पूर्ण कुटुंबाची मालमत्ता जप्त करावी”, अशी आक्रमक प्रतिक्रिया आनंद दवे यांनी दिली.

आनंद दवे नेमकं काय म्हणाले?

“प्रदीप कुरुलकर खरंच दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. फक्त त्यांच्यावरच नाही तर त्यांच्या नातेवाईकांवर सुद्धा ज्यांना आपण स्लीपर सेल म्हणू शकतो, त्यांना माहिती होतं की, आपल्या घरातला कर्ता पुरुष काय उद्योग करतोय, येणारे पैसे कसे येत आहेत हे माहिती असूनही त्यांना सहकार्य केलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांच्या सुद्धा मालमत्ता जप्त व्हायला पाहिजेत, असं हिंदू महासंघाचं स्पष्ट म्हणणं आहे”, अशी भूमिका आनंद दवे यांनी मांडली.

“जसे अनेक गुन्ह्यांमध्ये नंतर लोकं सुटली आहेत तसं ते निर्दोष सुटू नये. तसेच त्यांना या प्रकरणात दोषी बनवून अडकवण्याचे प्रयत्न तर केले जात नाहीत ना, हे सुद्धा बघण्याचं काम शासनाचं आहे. शासनाने ते करावं. पण कुरुलकरांची एक साखळीच दिसतेय. त्यांनी देशद्रोही कारवाईमध्ये लोकांनाही आणलंय असं दिसतंय. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. त्यांना जामीन मिळता कामा नये”, अशी मागणी आनंद दवे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

संबंधित प्रकरणात नेमक्या हालचाली काय?

दरम्यान, “या प्रकरणात पुरावे हाती लागले तर कलम वाढवण्याचा अधिकार तपास यंत्रणांना आहे. डीव्हाईसमध्ये काय हाती लागलं हे प्रकरण संवेदनशील असल्यानं माहिती समोर देऊ शकत नाही. हे प्रकरण खूप संवेदनशील आहे. याचा तपास सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया सरकारी वकिल चंद्रसेन साळवी यांनी दिली. तर “आम्ही बचाव पक्षाचे वकिल आहोत. या प्रकरणात काय होईल हा सगळा अधिकार तपास यंत्रणांणा आहे. तपास यंत्रणा काम करत आहे. आज कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे”, अशी प्रतिक्रिया प्रदीप कुरुलकरचे वकील ऋषीकेश गानू यांनी दिली.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.